जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सीईओंची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:08+5:302021-06-01T04:30:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजन किंवा आरटीसीपीआर चाचणी ...

CEO's notice to 11 primary health centers in the district | जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सीईओंची नोटीस

जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सीईओंची नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजन किंवा आरटीसीपीआर चाचणी अहवाल पोर्टलवर अपलोड न करणाऱ्या जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचा खुलासा सात दिवसांत करावा, असेही नोटिसीत स्पष्ट केले आहे.

याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजन अथवा आरटीसीपीआर चाचणी करण्यात येते. या सर्व चाचण्या सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच काही मान्यताप्राप्त खासगी लॅबमध्ये करण्यात येत आहेत. मात्र, मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णदर राज्यापेक्षा जास्त आला. त्यातच चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीत रॅपिड अँटिजन टेस्टच्या आकडेवारीतील तफावतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. याबाबत सुधारणा न झाल्यास गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्टपणे सांगितले होते.

या आढावा बैठकीनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि चाचणी निष्कर्ष पोर्टलवर कोणत्याही परिस्थितीत त्या त्या दिवशीच अपलोड करावेत, असे स्पष्ट केले. या अनुषंगाने माहिती संकलित केली असता प्रत्यक्षात केलेल्या चाचणीची संख्या व पोर्टलवर अपलोड केलेल्या चाचण्यांची संख्या यामध्ये मोठी तफावत आढळून आली. यामध्ये प्रामुख्याने निगेटिव्ह चाचण्यांचे निष्कर्ष अपलोड केले नसल्याचे निदर्शनास आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये सातारा, फलटण, पाटण आणि कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

......

Web Title: CEO's notice to 11 primary health centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.