चाफळला दूषित पाण्यामुळे अतिसाराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:47+5:302021-01-17T04:33:47+5:30

चाफळ येथे चार दिवसांपुर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला गळती लागली होती. त्यामुळे दोन दिवस गावात पाणीपुरवठा बंद होता. गळती ...

Chafal is suffering from diarrhea due to contaminated water | चाफळला दूषित पाण्यामुळे अतिसाराची साथ

चाफळला दूषित पाण्यामुळे अतिसाराची साथ

Next

चाफळ येथे चार दिवसांपुर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला गळती लागली होती. त्यामुळे दोन दिवस गावात पाणीपुरवठा बंद होता. गळती काढल्यानंतर पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा झाला. या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिसाराची साथ पसरली. शुभम चंद्रकांत कुंभार, शौर्य रवींद्र कुंभार, निशिगंधा दीपक कुंभार, श्रावणी भीमराव कुंभार, जगुबाई नाना साळुंखे, अनिल राजेंद्र कुंभार, अनुष्का सुरेश कुंभार, राज पाटील, वैभव पाटील, तृप्ती करकरे, पोलीस पाटील सागर चव्हाण, प्रकाश गणपती चव्हाण, वसंत बाळू चव्हाण, विनायक बबन कुंभार, आदिती पाटील, आरती कांबळे, विकास हिंदोळे, सुनीता दत्तात्रय पाटील, दीप्ती शिंदे, रुद्र जंगम, कमल काटे, काशिनाथ साळुंखे, गंगाराम वाघमारे, प्रिया कुंभार, हणमंत शिंदे, वसंत चव्हाण, इशा शेख, श्रावणी चव्हाण, मोनाली बहुलेकर, अनुष्का वेदपाठक अशा सुमारे ३० जणांना अतिसाराची लागण झाली आहे. यापैकी केवळ सात रुग्णांची आरोग्य केंद्रात नोंद झाली आहे, तर इतर रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. गावात साथ असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Chafal is suffering from diarrhea due to contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.