चाफळला सुवर्ण कलश सोहळा अखंडितपणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:16+5:302021-08-22T04:42:16+5:30

चाफळ : मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक दिवंगत अरविंदशेठ मफतलाल यांनी चाफळला श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर चाफळचे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पुंडलिक ...

The Chafala Golden Kalash ceremony continues uninterrupted | चाफळला सुवर्ण कलश सोहळा अखंडितपणे सुरू

चाफळला सुवर्ण कलश सोहळा अखंडितपणे सुरू

Next

चाफळ : मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक दिवंगत अरविंदशेठ मफतलाल यांनी चाफळला श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर चाफळचे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पुंडलिक हरी पाटील यांनी चाफळ विभागातील जपधारकांच्यावतीने सुवर्ण श्रीफळ पूजन व त्या सुवर्ण श्रीफळाचा नारळी पौर्णिमेला समुद्रास अर्पण सोहळा सुरू केला होता. तो आजही अखंडितपणे सुरू आहे. यावर्षी त्यांचे नातू सागर शिरीष पाटील व अमोल दत्तात्रय पवार यांनी हा सोहळा जपधारकांच्यावतीने पार पाडला. यावेळी चाफळचे सरपंच आशिष पवार यांच्यासह रामनाम जपधारकांची उपस्थित होती.

तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा लाभलेल्या चाफळच्या या श्रीराम मंदिराचा हा पुण्यसोहळा दरवर्षी साजरा केला जातो. १९७७ मध्ये चाफळसह परिसरात दुष्काळ पडला होता. या दरम्यान चाफळचे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पुंडलिक हरी पाटील यांनी उद्योजक दिवंगत अरविंदशेठ मफतलाल यांच्या सहकार्याने चाफळ विभागातील ग्रामस्थांना एकत्र केले. चाफळच्या श्रीराम मंदिरात ‘श्रीराम जय राम, जय जय राम’ नामाचा तीन हजार कोटी वेळा जप सुरू केला होता. तेव्हापासून ही जपाची परंपरा सुरू झाली व ती आजही अखंडितपणे सुरू आहे.

दिवंगत पुंडलिक पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र चाफळचे लोकनियुक्त सरपंच दिवंगत सूर्यकांत पाटील यांनी ही परंपरा जोपासली होती. नुकतेच त्यांचे निधन झाल्याने त्यांचे पुतणे सागर पाटील व सोसायटीचे सचिव अमोल पवार यांनी पुढाकार घेत ही परंपरा सुरू ठेवली आहे. येथील श्रीराम मंदिरात नुकतेच या सुवर्ण नारळाचे पूजन चाफळचे नूतन सरपंच आशिष पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सागर पाटील, अमोल पवार, काकासो कोळी यांच्यासह रामनाम जपधारक उपस्थित होते.

चौकट

सुवर्ण नारळ म्हणजे नक्की काय

चाफळ विभागातील जपधारकांच्यावतीने एक नारळ तयार केला जातो. त्या नारळास सोनेरी रंगाच्या कागदाने सजवले जाते. त्याला सुवर्णकलश म्हटले जाते. या कलशाचे सर्वप्रथम रामंदिरात पूजन केले जाते. त्यानंतर चाफळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्येष्ठ जपधारकांच्या हस्ते पूजन करत तो भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतो. नारळी पौर्णिमेदिवशी हा सुवर्ण कलश मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे समुद्रात अर्पण केला जातो. उत्सवाचे यंदा ४४ वे वर्षे आहे.

Web Title: The Chafala Golden Kalash ceremony continues uninterrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.