चाफळला पोलिसांचा रस्त्यावरच खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:10+5:302021-05-07T04:41:10+5:30

चाफळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मेपासून कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. लाॅकडाऊनच्या सुधारित आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत ...

Chafala police guard the road | चाफळला पोलिसांचा रस्त्यावरच खडा पहारा

चाफळला पोलिसांचा रस्त्यावरच खडा पहारा

googlenewsNext

चाफळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मेपासून कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. लाॅकडाऊनच्या सुधारित आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना चाफळ पोलिसांनी मंगळवारपासून रस्त्यावर खडा पहारा ठेवला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या सुमारे ३० दुचाकी गाड्या जप्त करत वाहनधारकांवर चाफळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मोकाट फिरणाऱ्यांनो सावधान नाही तर गाडी होईल जप्तचा इशारा एकप्रकारे पोलीस प्रशासनाने देत विभागात वचक बसवल्याने उनाड फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लाॅकडाऊनचे सुधारित आदेश पारित केल्यानंतर उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ बिटाचे अमृत आळंदे, सुशांत शिंदे व होमगार्ड यांनी मंगळवारपासून चाफळ विभागात कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच चाफळ-पाडळोशी या मुख्य रस्त्यासह चाफळ गावात प्रवेश करणाऱ्या मार्गावर खडा पहारा ठेवला आहे. लाॅकडाऊन काळात कडक निर्बंध लागू केलेले असताना विभागातील काहीजण राजरोसपणे नेहमीच्या फिल्मी स्टाइलमध्ये दुचाकी गाड्या चालवत आहेत. या महाभागांना चाफळ पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवत मंगळवारी विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या सुमारे ३० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

दरम्यान, चाफळ व परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाणार आहे तसेच वाहन जप्तीसारखे कटु प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अथवा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, यावेळी कोणाचीही गय केली जाणार नाही. असा इशारा चाफळ बिटाचे पोलीस नाईक अमृत आळंदे यांनी दिला आहे.

Web Title: Chafala police guard the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.