चाफळचे चारुदत्त साळुंखे बनले ‘भाभा’मध्ये संशोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:44+5:302021-01-13T05:40:44+5:30
चाफळसारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असणाऱ्या आणि प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिरातून घेतलेल्या चारूदत्त साळुंखे यांना दहावीत ९४.५५ टक्के ...
चाफळसारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असणाऱ्या आणि प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिरातून घेतलेल्या चारूदत्त साळुंखे यांना दहावीत ९४.५५ टक्के गुण मिळाले होते. एका खासगी संस्थेत क्लर्क असणाऱ्या मोहनराव साळुंखे आणि शिक्षिका संगीता साळुंखे यांचा चारूदत्त हा मुलगा. दहावीनंतर त्यांनी विज्ञात शाखेत प्रवेश घेतला. बारावीत ९२.३३ टक्के गुण मिळविले. त्यानंतर पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. कॉलेजच्या अखेरच्या वर्षाला असताना एकाहून एक वरचढ खासगी कंपन्यांमधून नोकरीच्या संधी हातात असतानाही खासगी क्षेत्रात नोकरी न करता शासकीय सेवेत अधिकारी होण्याचा चारुदत्त यांनी निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टेक्निकल क्षेत्राला निवडून अखिल भारतीय स्तरावर झालेल्या ‘गेट २०२०’ या परीक्षेत देशामध्ये त्यांनी ४८ वा क्रमांक मिळविला. या यशामुळे त्यांच्या यशाच्या कमानीत नवा विक्रम प्रस्थापित झाला. यशाच्या जोरावरच त्यांची भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधकपदी मुलाखतीसाठी निवड झाली. तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखतीमधून चारुदत्त साळुंखे हे तावून सुलाखून निघाले. मात्र, संशोधक म्हणून निवड होऊन ते यशस्वी झाले.
- कोट
स्पर्धा परीक्षा आणि यातील संधी याविषयी प्रत्येक गरजूला मार्गदर्शन करण्याची तयारी ठेवली आहे. माझ्यासारख्या ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यास निश्चितच मदत करणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनीही प्रत्येक क्षेत्रात चौफेर यश मिळवावे. योग्य मार्गदर्शन घ्यावे. आणि आयुष्याची वाटचाल ध्येय डोळ्यासमोर ठेऊनच करावी.
- चारुदत्त साळुंखे, संशोधक
फोटो : १०चारूदत्त साळुंखे