चाफळची वाणवसा पूजन परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:11+5:302021-01-16T04:42:11+5:30
चाफळ येथे संक्रांतीदिनी हजारो महिला वाणवसा पूजनासाठी गर्दी करतात. हा अनोखा उत्सव सोहळा यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे व शासन ...
चाफळ येथे संक्रांतीदिनी हजारो महिला वाणवसा पूजनासाठी गर्दी करतात. हा अनोखा उत्सव सोहळा यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे व शासन आदेशामुळे साजरा करण्यात आला नाही. केवळ महिलांचा सहभाग असलेल्या या अनोख्या उत्सव सोहळ्यासाठी सकाळपासूनच मंदिरात सुवासिनी महिला वाणवसा पूजनासाठी प्रचंड गर्दी करतात. त्यामध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारो महिलांचा समावेश असतो. सुवासिनी महिला एकमेकींना हळदी- कुंकवाचे लेणे आणि तीळगूळ देत ‘सौभाग्याचा वसा, घ्यावा कसा, मी सांगते तसा, सीतामाई चरणी अर्पण जसा’ असे म्हणतात. मंदिर परिसरात मिळेल त्या ठिकाणी विड्याच्या पानावर वसा पूजनाचे साहित्य मांडत त्यावर हळदी-कुंकू वाहून सीतामाई चरणी अखंड सौभाग्याचे लेणे मनोभावे मागतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारी संकटामुळे या अनोख्या सोहळ्यापासून महिलांना वंचित राहावे लागले आहे.