जिल्हा शल्यचिकित्सकाच्या दालनासमोर साखळी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:36+5:302021-06-16T04:49:36+5:30
सातारा : जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनासमोर साखळी धरणे ...
सातारा : जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनासमोर साखळी धरणे आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा या वेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे गेले अनेक वर्षांपासून वर्ग ४ ची पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्त्वावरील चालू वर्षातील नेमणुका तत्काळ कराव्यात. १०,२०,३० वर्षांनंतरची मिळणारी अश्वाशीत प्रगती योजनेचा लाभ द्यावा. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निश्चिती करून फरकासह वेतन देण्यात यावे. संवर्गातील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत पदोन्नतीचा निर्णय तत्काळ घेण्यात यावा यांसह अन्य मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात आहेत. तर कागदी घोडे नाचवले जात आहेत. त्यामुळे मागण्या मान्य झाल्याशिवाय उतणार नसल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनास संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण, प्रकाश घाडगे, जीवन वाघमारे, सुरेश जाधव, शंकर माने, विजय नायडू, बळी गायकवाड, विद्या कांबळे आदी पदाधिकारी बसले आहेत.