पाटणला साखळी ठिय्या आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:29 AM2021-02-22T04:29:42+5:302021-02-22T04:29:42+5:30
पाटणच्या तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात पाटण तालुक्यातील विविध गावांतील युवक, ग्रामस्थ आणि महिला सहभागी होत आहेत. मराठा ...
पाटणच्या तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात पाटण तालुक्यातील विविध गावांतील युवक, ग्रामस्थ आणि महिला सहभागी होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा आदी घोषणांनी तहसील परिसर दररोज दणाणून जात आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी कोरडेवाडी गावातून मोठ्या संख्येने महिला, मुले, पालक व युवक ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले. कोरडेवाडी गावात बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी विनोद सावंत, संजय जाधव, संतोष पवार, सयाजी साळुंखे, बाळू साळुंखे, विलास जाधव, विजय साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेक मुलींनी मनोगत व्यक्त केले.