राजकीय सत्ताधाºयांपेक्षाही ‘सीईओं’ची खुर्ची अस्थिर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:46 PM2017-08-30T23:46:25+5:302017-08-30T23:46:25+5:30
सागर गुजर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची खुर्ची अस्थिर असल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र, या राजकीय पदांपेक्षाही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हे प्रशासकीय प्रमुख पद अस्थिर ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत पाच अधिकाºयांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे.
राजकीय संगीत खुर्चीचा प्रकार नेहमीच चर्चेत असतो. किंबहुना खुर्च्यांची ओढाओढ करण्याचे काम विरोधकांसह सत्ताधाºयांचे पक्षांतर्गत विरोधकही नेहमी करत असतात. ही राजकीय वर्तुळातील परिस्थिती आता प्रशासकीय कारभारातही निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागाला विकासाचा चेहरा देण्याचे काम जिल्हा परिषद करीत असते. सुदैवाने जिल्हा परिषदेला अभ्यासू मुख्य कार्यकारी कार्यकारी मिळाल्याने विविध पातळ्यांवर जिल्हा परिषदेने आपली घोडदौड सुरू ठेवली. स्वच्छता, पाणीपुरवठा, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घरे, झिरो पेंडन्सी या कामांच्या बाबतीत सातारा नेहमी राज्यात अग्रेसर राहिला आहे. देशपातळीवरही विविध पुरस्कार मिळाल्याने सातारा देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकला आहे.
ही परिस्थिती एका बाजूला असली तरी जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असणाºया मुख्य कार्यकारी अधिकाºयांना काम करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याचे चित्र आहे. मंत्रालयातील ज्या अधिकाºयाला ‘आएएस’पदी बढती मिळते, अशी मंडळी पहिल्यांदा साताºयात पाठविली जातात. साताºयात अनेक मोहिमांना लोकसहभाग चांगला मिळतो. राजकीय व प्रशासकीय पातळीवरूनही चांगली साथ मिळत असल्याने काम उठावदार होते. त्यातच डॉ. राजेश देशमुख यांच्यासारखे अधिकारी असतील तर आपोआपच इतर अधिकाºयांनाही प्रोत्साहन मिळून एका उंचीवर कामे के ली जातात. ही उंची गाठली जात असतानाच डॉ. देशमुख यांची १४ महिन्यांतच बदली झाली.
जिल्हा परिषदेचा १९६२ ते २0१७ या ५५ वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास केल्यास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता यांना २ मे १९९९ ते १0 आॅक्टोबर १९९९ असा सर्वात कमी म्हणजे अवघे ५ महिने काम करण्याची संधी मिळाली. एस. डी. चौगुले यांना सर्वात जास्त म्हणजे १0 आॅक्टोबर १९८३ ते २३ जून १९८७ या चार वर्षांच्या कालावधीत काम करण्याची संधी मिळाली. २0१२ ते २0१७ या पाच वर्षांच्या कालावधीत अभिजीत बांगर, जी. श्रीकांत, नितीन पाटील, डॉ. राजेश देशमुख या चार अधिकाºयांची बदली झाली आहे. सरकार बदलले की प्रमुख अधिकाºयांच्याही बदल्या केल्या जातात, असा पूर्वइतिहास असल्याने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे हेही दोन वर्षांपेक्षा जास्त काळ साताºयात राहू शकतील का? हा प्रश्न आहे. कारण येत्या दोन वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. साहजिकच कैलास शिंदे हे तरी किती काळ राहतील, हा प्रश्न आहे.
५५ वर्षांत २९ अधिकाºयांनी
पाहिला कार्यभार...
वरिष्ठ अधिकाºयांच्या तीन वर्षांनंतर बदल्या होत असतात. साहजिकच जिल्हा परिषदेच्या ५५ वर्षांच्या इतिहासात १८ मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कार्यभार सांभाळायला हवा होता. परंतु, याजागी तब्बल २९ मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी हे काम पाहिले.
नवीन सीईओंपुढे आव्हान...
गेल्या १४ महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाने भलताच वेग धरला होता. हा वेग कायम ठेवण्याचे मोठे आव्हान नवीन सीईओ कैलास शिंदे यांच्यापुढे असणार आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.३१) सायंकाळी ४ वाजता जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मावळते सीईओ डॉ. राजेश देशमुख यांचा निरोप समारंभ होणार आहे.