सत्ता टिकविण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान
By admin | Published: January 11, 2017 11:28 PM2017-01-11T23:28:42+5:302017-01-11T23:28:42+5:30
दुसऱ्या टप्प्यात मतदान : कॉँग्रेस, भाजप, शिवसेना आखणार नवीन रणनीती
सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत बहुमत, तर सर्वच पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत ही सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे असणार आहे.
गेली दीड दशके सातारा जिल्ह्याच्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्विवाद वर्चस्व निर्माण केलेल्या राष्ट्रवादीसमोर काँगे्रस प्रथमच वेगळ्या पद्धतीने आव्हान उभे करण्याच्या
तयारीत आहे. स्थानिक पातळीवर आघाड्या करून राष्ट्रवादीला जेरीस आणण्याची रणनीती काँगे्रस, भाजप, शिवसेना या पक्षांनी आखलेली पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी तालुकावार मेळावे घेऊन वातावरणनिर्मिती केली आहे. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या
पोटात गोळा आला आहे. या
राजकीय परिस्थितीचा लाभ घेऊन राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचे राजकारण शिजू लागले आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी ११ पंचायत समित्या व जिल्हा परिषदेतील
आपली सत्ता टिकवून ठेवणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
(प्रतिनिधी)बालेकिल्ल्यात घमासान
सातारा : राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँगे्रस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर पक्षांनी जोरदार व्यूव्हरचना केली
आहे.