साखर कारखान्यांपुढील आव्हाने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:04+5:302021-03-04T05:14:04+5:30

यशवंतनगर, ता. कऱ्हाड सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी विभागाकडील प्रतिदिन ४५ हजार लीटर इथेनॉलनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ...

The challenges facing the sugar factories increased | साखर कारखान्यांपुढील आव्हाने वाढली

साखर कारखान्यांपुढील आव्हाने वाढली

Next

यशवंतनगर, ता. कऱ्हाड सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी विभागाकडील प्रतिदिन ४५ हजार लीटर इथेनॉलनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मीताई गायकवाड, संचालक सुरेशराव माने, मानसिंगराव जगदाळे, डी.बी. जाधव, माणिकराव पाटील, कांतिलाल भोसले, जशराज पाटील, अविनाश माने, लालासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने प्रतिदिन ४५ हजार लीटर इथेनॉल उत्पादनाच्या प्रकल्पाचे काम पूर्ण केलेले आहे. आजपासून इथेनॉल उत्पादनाला सुरुवात करण्यात आलेली आहे. या इथेनॉल प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलच्या विक्रीबाबत शासनासोबत करार करण्यात येणार आहे. प्रतिदिन १ लाख लीटर उत्पादन क्षमतेचा स्वतंत्र अत्याधुनिक इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळालेल्या असून, लवकरच प्रतिदिन १ लाख लीटर क्षमतेचा इथेनॉलनिर्मिती प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

रामचंद्र पाटील, बजरंग पवार, सर्जेराव खंडाईत, रामदास पवार, वसंत कणसे, संतोष घार्गे, जयवंत थोरात, लहुराज जाधव, संजय कुंभार, शारदा पाटील, पै. संजय थोरात, पांडुरंग चव्हाण उपस्थित होते.

फोटो : ०३केआरडी०६

कॅप्शन : यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर इथेनॉल उत्पादन प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील, सुनील माने, लक्ष्मीताई गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: The challenges facing the sugar factories increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.