डेरवण ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:18+5:302021-08-23T04:41:18+5:30
चाफळ : विभागातील डेरवण ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांची योग्यप्रकारे काळजी घेतली आहे. गत पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने जलजन्य साथीच्या आजारांना ...
चाफळ : विभागातील डेरवण ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांची योग्यप्रकारे काळजी घेतली आहे. गत पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने जलजन्य साथीच्या आजारांना गावच्या वेशीवरच रोखले आहे. याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने पिण्याचे पाणी स्रोत स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र देत गौरव केला आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून डेरवण गावची तालुक्यात ओळख आहे. या गावच्या ग्रामपंचायतीचा विस्तारही मोठा आहे. डेरवण गावासह बोर्गेवाडी, कोळेकरवाडी, भैरेवाडी या गावांचा डेरवण ग्रामपंचायतींतर्गत समावेश होतो. सरपंच आशाताई यादव, तत्कालीन ग्रामसेवक वसंत पवार व पदाधिकाऱ्यांनी या चार गावांचे पाण्याचे स्रोत वेळोवेळी शासनाच्या आरोग्य विभागाकडून तपासून घेत शुद्ध पाणी पुरवठा केला आहे. डेरवण ग्रामपंचायतीने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र दिले आहे.
यावेळी चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे, उपसरपंच प्रकाश पाटोळे, ग्रामसेवक रावते, गटप्रवर्तक कांचन पाटील, आकाराम यादव, आशा सेविका सोनवले, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.