चंद्रभागा ओढ्याची चाळण; पण महसूल शून्य, प्रशासनही हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 03:00 PM2021-03-20T15:00:00+5:302021-03-20T15:01:40+5:30
sand Wai Satara-वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील वाळूचा विनापरवाना उपसा सुरू आहे. पात्राची चाळण झाली त्यामुळे वाईच्या तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना याप्रकरणी छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. पण उपयोग काहीच न झाल्याने अखेर संबंधित तलाठ्यावरच कारवाई करण्याची वेळ तहसीलदारांवर आली. यामुळे वाळू तस्करांसह तलाठ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
वेळे : वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील वाळूचा विनापरवाना उपसा सुरू आहे. पात्राची चाळण झाली त्यामुळे वाईच्यातहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना याप्रकरणी छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. पण उपयोग काहीच न झाल्याने अखेर संबंधित तलाठ्यावरच कारवाई करण्याची वेळ तहसीलदारांवर आली. यामुळे वाळू तस्करांसह तलाठ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील दिवसा ढवळ्या विना परवाना हजारो ब्रास वाळू उपसा सुरू होता. त्याच गावातील गेली कित्येक वर्षापासून शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडवून मनोज भोईटे हा वाळूचा व्यवसाय करत असतो. २५ फेब्रुवारी रोजी मनोज भोईटे हा विना परवाना वाळू उपसा करत असल्याची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना मिळाली. त्यांनी तलाठी डी. डी. कुंभार यांना ओढ्याच्या पात्रात चोरुन उत्खनन होत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्याचे मोबाईलवरुन आदेश दिले होते.
या आदेशाचे पालन करुन तलाठी कुंभार घटना स्थळावर पोहचून त्यांनी चोरुन काढलेल्या वाळूचा आणी चाळणी, टिकाव, खोरी या वस्तू जप्त केल्या. त्यांचा पंचनामा करून सर्व साहित्य वाईच्या तहसीलदार कार्यालयात जमा केले. पंचनामा तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे पुढील कारवाई साठी देण्यात आला.
या दिलेल्या पंचनाम्याची गंभीर दखल तहसीलदार रणजित भोसले यांनी घेऊन त्यांनी तत्काळ वाळू चोर असणारा मनोज भोईटे याला १ लाख १८ हजार रुपये दंडाची नोटीस काढून ती तातडीने तलाठी, सर्कल मार्फत बजावून त्याची पोहच घेऊन पुन्हा त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते पण तलाठी कुंभार तलाठी यांनी तहसीलदार यांचा लेखी आदेश धुडकावून काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने तलाठी वर्गा मध्ये खळबळ उडाली आहे.