चंद्रभागा ओढ्याची चाळण; पण महसूल शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:37 AM2021-03-21T04:37:45+5:302021-03-21T04:37:45+5:30

वेळे : वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील वाळूचा विनापरवाना उपसा सुरू आहे. पात्राची चाळण झाली. त्यामुळे वाईच्या ...

Chandrabhaga stream sieve; But the revenue is zero | चंद्रभागा ओढ्याची चाळण; पण महसूल शून्य

चंद्रभागा ओढ्याची चाळण; पण महसूल शून्य

Next

वेळे : वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील वाळूचा विनापरवाना उपसा सुरू आहे. पात्राची चाळण झाली. त्यामुळे वाईच्या तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना याप्रकरणी छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. पण उपयोग काहीच न झाल्याने अखेर संबंधित तलाठ्यावरच कारवाई करण्याची वेळ तहसीलदारांवर आली. यामुळे वाळू तस्करांसह तलाठ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील दिवसा ढवळ्या विना परवाना हजारो ब्रास वाळू उपसा सुरू होता. त्याच गावातील गेली कित्येक वर्षांपासून शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडवून मनोज भोईटे हा वाळूचा व्यवसाय करीत आहे. २५ फेब्रुवारी रोजी मनोज भोईटे हा विना परवाना वाळू उपसा करीत असल्याची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना मिळाली. त्यांनी तलाठी डी. डी. कुंभार यांना ओढ्याच्या पात्रात चोरून उत्खनन होत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्याचे मोबाईलवरून आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करून तलाठी कुंभार घटनास्थळावर पोहचून त्यांनी चोरून काढलेल्या वाळूचा आणि चाळणी, टिकाव, खोरी या वस्तू जप्त केल्या. त्यांचा पंचनामा करून सर्व साहित्य वाईच्या तहसीलदार कार्यालयात जमा केले. पंचनामा तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आला.

या दिलेल्या पंचनाम्याची गंभीर दखल तहसीलदार रणजित भोसले यांनी घेऊन त्यांनी तत्काळ वाळू चोर असणारा मनोज भोईटे याला १ लाख १८ हजार रुपये दंडाची नोटीस काढून ती तातडीने तलाठी, सर्कल मार्फत बजावून त्याची पोहोच घेऊन पुन्हा त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण तलाठी कुंभार तलाठी यांनी तहसीलदार यांचा लेखी आदेश धुडकावून काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने तलाठी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.

फोटो : २०वेळे ट्रॅक्टर

ओझर्डे (तालुका वाई) येथील चंद्रभागा ओढ्यातून वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे.

Web Title: Chandrabhaga stream sieve; But the revenue is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.