उदयनराजेंनी चिथावणीखोर वक्तव्य करू नये -चंद्रकांत खंडाईत : देशाच्या सर्वोच्च सभागृहात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:40 AM2018-01-07T00:40:31+5:302018-01-07T01:02:17+5:30
सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली.
सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली. त्यावेळी गप्प बसलेले साताºयाचे लोकप्रतिनिधी बाहेर मात्र चिथावणीखोर वक्तव्ये करतात. खासदार उदयनराजे भोसले यांनी संसदेत भूमिका मांडावी,’ अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खंडाईत यांनी म्हटले आहे की, खासदार उदयनराजे भोसले यांनी खरे तर वढू या गावी जाऊन छत्रपती संभाजीराजे यांचा अखेरचा इतिहास समजून घ्यावा. त्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या शूरवीरांनाही समजून घ्यावे. नंतर ही दंगल कोणत्या विचाराने घडवण्यात आली याचा विचार करूनच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची महती लोकांना सांगावी. ज्या विचारसरणीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचेही विद्रूपीकरण केले. त्यांचे समर्थन आपण केले. २१ व्या शतकात वंचितांना न्याय मिळावा म्हणून निर्माण केलेल्या अॅट्रॉसिटी अॅक्टलाही विरोध केला. त्यामुळे आपणही मनुस्मृतीच्या व्यवस्थेला बळी पडलेला आहात. यावरूनच कोणाची लायकी काय आहे, हे जनतेला समजून येईल.
खंडाईत यांनी पुढे म्हटले आहे की, साताºयाचे लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांनी मी जातपात मानत नाही, असे गुळगुळीत शब्द वापरून नंतर ३५ टक्के बाहेर पडले तर काय? आणि बाकीचे किती टक्के आहेत, असे चिथावणीखोर वक्तव्ये केली. याचा भारिप बहुजन महासंघ व समविचारी पक्षांच्या वतीने तीव्र निषेध आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी एका समूहाला जवळ आणि एका समूहाला दूर सारून पक्षपातीपणाची भूमिका बजावू नये. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तेड निर्माण करण्याचा प्रयत्न
केला जात आहे. हे चुकीचे आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा. निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सिद्धार्थ खरात, विशाल भोसले, गणेश भिसे, जयवंत कांबळे उपस्थित होते.
सामाजिक सलोखा राखावा
‘लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी एका समूहाला जवळ आणि एका समूहाला दूर सारून पक्षपातीपणाची भूमिका बजावू नये. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहनही चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत केले.