चंद्रकांत पाटील यांना आता विश्रांतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:37 AM2021-01-03T04:37:59+5:302021-01-03T04:37:59+5:30

वाई : ‘चंद्रकांत पाटील हे पुणे, कोल्हापूर, राज्याच्या राजकारणात राहायचे की परत जायचे याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला सीमित ...

Chandrakant Patil needs rest now | चंद्रकांत पाटील यांना आता विश्रांतीची गरज

चंद्रकांत पाटील यांना आता विश्रांतीची गरज

Next

वाई : ‘चंद्रकांत पाटील हे पुणे, कोल्हापूर, राज्याच्या राजकारणात राहायचे की परत जायचे याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला सीमित करत आहेत; परंतु खरे तर त्यांना खऱ्या विश्रांतीची गरज आहे,’ अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी मारली.

पुणे-बंगलोर महामार्गावर जोशीविहीर, (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्‌घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, संचालक नितीन पाटील, शशिकांत पिसाळ, धनंजय पिसाळ, आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांना रोज काय तरी बोलून चर्चेत ठेवण्यापेक्षा त्यांना खऱ्या विश्रांतीची गरज आहे. मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्याविषयी जे पुरावे पुढे येतील त्यानुसार त्यांच्यावर काय कारवाई करणार, ते या विभागाचे मंत्री सांगू शकतील. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. खरा संभ्रम विरोधकांमध्येच आहे. त्यांना मुद्दे सापडत नसल्याने फडणवीस आणि पाटील एवढाच विषय दिसत आहे.’

राज्य सरकार आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष जबाबदारीने विकासाला गती देण्याचे काम करीत आहेत. आम्ही राज्याच्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारचे एक वर्ष कोरोना आपत्तीतून बाहेर पडण्यात गेले आहे. त्यामुळे सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चांगला समन्वय आहे. राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन, कालव्याची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला महाविकास आघाडीचे प्राधान्य असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Chandrakant Patil needs rest now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.