विटांनीच भरलं नदीचं पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:57 PM2018-08-12T22:57:43+5:302018-08-12T22:57:47+5:30

The character of the river filled with brick | विटांनीच भरलं नदीचं पात्र

विटांनीच भरलं नदीचं पात्र

Next

विकास शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलठण : वाढत्या शहरीकरणामुळे जुन्या इमारती, वाडे पाडून टोलेजंग टॉवर उभारले जात आहे. पाडलेल्या इमारतीतील दगडगोटे, विटा, माती बाणगंगा नदीत आणून टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होत असल्याने नदीची प्रकृती धोक्यात आली आहे. यामुळे निसर्गावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला.
सीतामाईच्या डोंगर कड्यावरून वाहन येणारी बाणगंगा नदी उपळवे, दालवडी, मांडवखडक, कुरवली, तावडीमार्गे फलटण शहराच्या माध्यमातून प्रवेश करत पुढे कांबळेश्वर, सोमंथळीजवळ नीरा नदीला मिळते. बाणगंगा कधीकाळी चार महिने वाहत होती. आपल्या परिसंस्थेवर ती अनेकांना जगवत होती. शेती, पशुपक्षी यांना वरदान ठरत होती. मोठा पाऊस झाल्यावर ती तिचं अस्तित्व सिद्ध करते.
बाणगंगा नदीच्या दुर्लक्षामुळे तिची नैसर्गिक प्रकृती हरवत चालली आहे. पद्मावती मंदिर परिसरातून नदी फलटणकडे धाव घेते. येथूनच तिचा संघर्ष सुरू होतो. फलटण झपाट्याने वाढत आहे. उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. जुन्या इमारतींचा राडा रोडा दगड, वीट, माती टाकण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे बाणगंगेचं पात्र असा नागरिकांचा समज झाला आहे. यामुळे नदीचे पात्र अडवले जात आहे. पात्र अरुंद होत आहे. या घाणीमुळे पावसाळ्यात पाणी व्यवस्थित पूर्ण क्षमतेने वाहू शकत नाही. परिणामी दुसऱ्या बाजूने पात्र विस्तारताना दिसते. यामुळे नदीपात्राशेजारील घरांना धोका निर्माण करतो. शनी मंदिराजवळ असणारा परिसर धोक्यात आहे.
प्रशासनाची डोळेझाक
बाणगंगेचे पात्र पूर्वी बºयापैकी स्वच्छ होते; पण फलटणच्या वाढत्या विस्ताराने बाणगंगेच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभे आहेत. फक्त राडा रोडाच नाही तर अनेक प्रकारची मानवी अतिक्रमने पाहायला मिळतात. प्रशासन डोळ्यावर हात ठेवून आहे. बाणगंगेच्या नैसर्गिक प्रकृतीशी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ नये व तिची जपणूक व्हावी म्हणून आणखी खूप प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

Web Title: The character of the river filled with brick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.