कऱ्हाडचा चारुदत्त साळुंखे देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:05+5:302021-04-14T04:36:05+5:30
पाटण तालुक्यातील चाफळ हे चारुदत्त साळुंखे याचे मूळगाव असून, त्याचे कुटुंबीय कऱ्हाडात वास्तव्यास आहेत. चारुदत्तचे प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श ...
पाटण तालुक्यातील चाफळ हे चारुदत्त साळुंखे याचे मूळगाव असून, त्याचे कुटुंबीय कऱ्हाडात वास्तव्यास आहेत. चारुदत्तचे प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिरमध्ये झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने शिवाजी हायस्कूलमध्ये घेतले. दहावीत त्याला ९४.५५ टक्के गुण मिळाले होते. दहावीनंतर सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातून त्याने ९२.३३ टक्क्यांसह विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली. सीईटी परीक्षेत १८४ गुण मिळवून पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच शासकीय सेवेत अधिकारी होण्याचे ध्येय चारुदत्त यांनी बाळगले होते.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टेक्निकल क्षेत्राला निवडून अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गेट २०२० या परीक्षेत चारुदत्तने देशात ४८वा क्रमांक मिळवला. या यशाच्या जोरावरच भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी त्याची निवड झाली. तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखतीमध्ये चारुदत्त यांनी यश मिळवले. भाभामध्ये काम करीत असतानाच त्याने अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली आणि या परीक्षेतही त्याने भरघोस यश मिळवले.
चारुदत्त यांची श्रेणी १ पदावर नेमणूक
चारूदत्त साळूंखे यांची श्रेणी १ पदावर नेमणूक होणार आहे. अभियांत्रीकी आणि व्यवस्थापन या दोन्हीची संयुक्तिक जबाबदारी असणाºया ठिकाणी अशी पदे असून केंद्रीय जल आयोग, भुदल, नौदल आदी ठिकाणी ही पदे आहेत.
फोटो : १३ चारुदत्त साळुंखे