महामोर्चासाठी चूल अन् गाव बंद

By admin | Published: September 30, 2016 01:12 AM2016-09-30T01:12:54+5:302016-09-30T01:27:28+5:30

नियोजन बैठक : चिंचणेर वंदनमध्ये एकवटली स्त्री शक्ती

Chaul and the village closed for the grand agitation | महामोर्चासाठी चूल अन् गाव बंद

महामोर्चासाठी चूल अन् गाव बंद

Next

सातारा : साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मराठा महामोर्चासाठी चिंचणेर वंदन, ता. सातारा येथे आयोजित बैठकीत पंचक्रोशीतील महिला एकत्र आल्या होत्या. या बैठकीत त्यांनी ‘चूल बंद, गाव बंद’ असा निर्णय घेऊन महामोर्चात सामील होण्याचा निर्णय घेतला.
चिंचणेर वंदन येथील श्रीराम मंदिरमध्ये महामोर्चा नियोजन बैठक झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयीन युवती आणि महिलांनी कोपर्डी घटनेतील नराधमांना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी जोरदार मागणी केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा यावर आपली मते व्यक्त केली.
बहुतांश मराठा समाज हा शेती करीत आहे. या समाजातील शेतकरी अल्पभूधारक आहे. आज अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच अन्य विभागांत प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी भरावी लागत आहे. मात्र, पालकांना ती भरणे अशक्य असते. त्यामुळे गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, अशा भावनाही या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी समाज बांधवांच्या बरोबर महामोर्चात सहभागी होणार आहे. ‘चूल बंद, गाव बंद’ करून सहकुटुंब सामील होऊन महामोर्चा यशस्वी करणार आहे, असे यावेळी महिलांनी सांगितले. शेवटी महिलांनी बहुसंख्येने महामोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या बैैठकीत काश्मीरमधील उरी येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)


मराठा समाजाची विराट ताकद दाखविण्याचा निर्णय
सातारा : सातारा येथील मराठा क्रांती महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मराठा समाजबांधव पुढे आला आहे. विशेष म्हणजे मराठा बांधवांबरोबरच समाजातील अन्य घटकही त्यामध्ये सहभागी होणार असून, त्यांनी त्याबाबतची घोषणाही शुक्रवारी केली आहे. सातारा तालुक्यातील अनेक गावांनी तर चूल बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. मराठा क्रांती महामोर्चात आबालवृद्ध सहभागी होणार असल्याचा निर्धार करण्यात आला असून, सातारा तालुका आणि सातारा शहराच्या नियोजन बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
दरम्यान, सातारा शहरात प्रमुख महामोर्चा असल्यामुळे सातारकर थोरल्या भावाची भूमिका बजावणार आहेत. साताऱ्यात येणाऱ्या वाहनांसाठी जवळपास ४० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्यात सर्वाधिक लोक सहभागी कसे होतील, यावर भर देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी मराठा क्रांती महामोर्चा होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सातारा येथील स्वराज मंगल कार्यालयात नियोजन बैठक झाली. या बैठकीत विविध मान्यवरांनी आपली मते मांडत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या नियोजन बैठक झाल्या आहेत. मात्र, सातारा तालुक्यातील बैठक सर्वात शेवटी घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक झाली.


दोन हजार रणरागिणींची आज नऊवारी साडीत दुचाकी रॅली

Web Title: Chaul and the village closed for the grand agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.