चवणेश्वरचा गेलेला निधी आला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:36 AM2021-03-25T04:36:57+5:302021-03-25T04:36:57+5:30
वाठार स्टे : उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठे पर्यटन ठिकाण असणाऱ्या चवणेश्वरचा गेलेला निधी पुन्हा परत आल्याने चवणेश्वर ग्रामस्थांमध्ये ...
वाठार स्टे :
उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठे पर्यटन ठिकाण असणाऱ्या चवणेश्वरचा गेलेला निधी पुन्हा परत आल्याने चवणेश्वर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नाला पुन्हा एकदा यश प्राप्त झाले आहे.
गेल्या वर्षी याच चवणेश्वरसाठी एक कोटी तेहतीस लाखाचा असा भरीव निधी मंजूर झाला होता. परंतु ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हा निधी परत गेला होता. गेले कित्येक वर्ष व कायम विकासापासून वंचित राहणारे गाव म्हणून चवणेश्वरकडे पाहिले जाते. याबाबत माध्यमांनी सतत भूमिका मांडल्याने लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. परंतु पुन्हा एकदा विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे हा पुन्हा एकदा भरीव निधी चवणेश्वर रस्त्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चवणेश्वरची जनता आनंदीत झालेली दिसून येत आहे.
यावेळी सरपंच दयानंद शेरे, युवा नेते हरिभाऊ शेरे, माजी सरपंच सुरेश सूर्यवंशी,मनोज रांजणे, बाळासाहेब सपकाळ, माजी सरपंच नीता पवार, रमेश पवार व ग्रामस्थ यांनी आभार मानले.