चव्हाणवाडी ग्रामस्थांचा पाणीप्रश्न निकाली
By Admin | Published: June 12, 2017 01:13 PM2017-06-12T13:13:21+5:302017-06-12T13:13:21+5:30
लोकसहभागातुन विहीरीचे खोदकाम, गाळ काढण्याचे काम
आॅनलाईन लोकमत
बुध (जि. सातारा) , दि. १२ : वर्धनगड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या चव्हाण वस्तीतील नागरिकांनी एकी दर्शन घडवत लोकसहभागातुन विहीरीचे खोदकाम आणि गाळ काढण्याचे काम केल्यामुळे चव्हाणवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
या नागरिकांच्या एकीचे खटाव तालुक्यात कौतुक होत असुन ग्रामस्थांची अशीच एकी राहिल्यास मोठ्या प्रमाणात विकास कामे करता येथील, आसा विश्वास वर्धनगडचे सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहीते यांनी व्यक्त केला.
चव्हाणवाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. अशा वेळी वर्धनगडचे उपसरपंच तुकाराम चव्हाण, कृष्णात माने, जोतिराम मोरे यांच्या पुढाकाराने व लोकहसभागातून विहिरीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचे ठरले.
शासनाची कसलीही मदत न घेता फक्त लोकवर्गणीतून या विहिरीचे काम पूर्ण केले. या कामी श्रीकांत माने, हणमंतराव वरेकर, बाळकृष्ण वरेकर, प्रकाश मोरे, मोहन माने, दशरथ शिंदे, शिवाजी पालकर, शंकर कांरडे, संदीप चव्हाण, सनी यादव, रमेश राठोड यांनी सढळ हस्ते मदत केली.