स्वस्त धान्य दुकानदारांचा कोरोनाविरुद्ध लढ्याला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:00+5:302021-05-17T04:37:00+5:30

वाई : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यापैकी बरेच रुग्ण कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोविड सेंटर ...

Cheap grain shopkeepers contribute to the fight against corona | स्वस्त धान्य दुकानदारांचा कोरोनाविरुद्ध लढ्याला हातभार

स्वस्त धान्य दुकानदारांचा कोरोनाविरुद्ध लढ्याला हातभार

Next

वाई : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यापैकी बरेच रुग्ण कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल होत असतात.

त्यापैकी बरेच रुग्ण हे कोरोना विषाणू प्रादुर्भावाची मध्यम ते तीव्र लक्षणे असणारे व ऑक्सिजनची आवश्यकता असणारे असतात. अशा रुग्णांना ऑक्सिजनसोबतच आवश्यक असणाऱ्या औषधी व इंजेकशन्सची कवठे आरोग्य केंद्र येथील कोविड सेंटरमध्ये कमतरता असल्याने आमदार मकरंद पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार व तालुका आरोग्य विभागाच्या मागणीनुसार रविवारी वाई तालुका महसूल प्रशासनतर्फे रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी व १ महिना पुरतील एवढी औषधी व इंजेकशन्स उपलब्ध करून उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. औषधी व इंजेकशन्ससाठी लागणारी रक्कम ही वाई उपविभागीय अधिकारी कार्यालयातील व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच वाई तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटना त्याचप्रमाणे वाई तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांनी वर्गणीतून जमा केली आहे.

Web Title: Cheap grain shopkeepers contribute to the fight against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.