रासायनिक द्रव्याचा टँकर खंबाटकी घाटात उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:59 PM2017-09-19T23:59:28+5:302017-09-19T23:59:28+5:30

Chemical tanker tanker reversed in Khambatki Ghat | रासायनिक द्रव्याचा टँकर खंबाटकी घाटात उलटला

रासायनिक द्रव्याचा टँकर खंबाटकी घाटात उलटला

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. घाटाच्या परिसरात उग्र वास सुटल्याने घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली.
खंबाटकी घाट उतरताना एका वळणावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा टँकर (टीएन ३० बीएच ६९७९) पलटी झाला. टँकर पलटी झाल्याने त्यामध्ये असलेले नायट्रिक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास पसरला.
या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. टँकरचा स्फोट होण्याच्या भीतीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली. उग्र वासाच्या व शरीरास अपायकारक द्र्रव्यामुळे टँकरजवळ जाण्यास भीती वाटत असल्याने पोलिसांनी वाई पालिका व भुर्इंज येथील किसन वीर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला बोलाविले.
अग्निशमनच्या दोन्ही गाड्या घटनास्थळी आल्यानंतर आम्लाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न जवानांनी सुरू केला. पाण्याचे फवारे टँकरवर मारले जात होते. या अपघातानंतर टँकर चालकाने गाडीतून उडी टाकून पलायन केले. त्यामुळे टँकर कोठून कोठे चालला होता? याबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे पोलिसांना संबंधित टँकर मालकाशी संपर्क साधता आला नाही.
खंबाटकी घाटातून साताºयाकडे येणारी वाहतूक अडविण्यात आली असून, ही वाहतूक बोगदामार्गे दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. बोगद्यामधून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहन चालकांना पोलिसांकडून काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या जात होत्या.
घाटात अ‍ॅसिड वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याचे समजताच प्रथम घाटातील वाहतूक बंद करण्यात आली. स्फोटक आम्ल नसले तरी शरीरास अपायकारक असल्याने योग्य खबरदारी पोलिसांनी घेतली.

Web Title: Chemical tanker tanker reversed in Khambatki Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.