शेवगा, टोमॅटो खातोय भाव
By admin | Published: July 13, 2017 03:36 PM2017-07-13T15:36:38+5:302017-07-13T15:36:38+5:30
आवक कमी झाल्याने फळभाज्यांच्या भावांत वाढ
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि.१३ : आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटो, शेवगा व ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या भावांत वाढ झाली. इतर फळभाज्यांची आवक माफक प्रमाणात असल्याने भावही स्थिर राहिले. पालेभाज्यांची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने भाव तेजीतच आहेत.
काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी बाजारात आवक घटली असून, काही फळभाज्यांसह पालेभाज्यांचे भावही तेजीत आहेत.
रविवारी टोमॅटोचे भाव प्रतिदहा किलोमागे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत गेले; तसेच शेवगा ४४० ते ५०० आणि ढोबळी मिरचीला ३५० ते ४०० रुपये भाव मिळाला. बाजारात टोमॅटोची केवळ ३.५ ते ४ हजार पेटी आवक झाली, तर आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवग्याची आवक झाली. इतर फळभाज्यांची आवकही तुलनेने
कमी होत असली, तरी भाव टिकून राहिले.