जिल्ह्यातील चौकांमध्ये बुध्दिबळाचे आयलँड
By admin | Published: September 7, 2016 11:25 PM2016-09-07T23:25:39+5:302016-09-07T23:54:42+5:30
शेखर गायकवाड : भाऊसाहेब पडसलगीकर क्रीडा पुरस्कार प्रदान
सातारा : गणेशमूर्तीच्या आगमनावेळी मिरवणुकीत झालेल्या वादातून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या गटात तलवार, दगड आणि काठीने तुंबळ हाणामारी झाली. ही घटना येथील मंगळवार पेठेतील कोल्हटकर आळीमध्ये मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. यामध्ये नऊजण जखमी झाले असून, २३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवार पेठेतील न्यू राजहंस गणेश मंडळ आणि होलार समाज सार्वजनिक गणेश मंडळाची गणेशमूर्ती सोमवारी वाजत-गाजत मिरवणुकीने आणण्यात येत होती. यावेळी पुढे जाण्याच्या कारणावरून या दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली होती. हा वाद दोन्ही मंडळांनी सामोपचाराने मिटविलाही होता; परंतु मंगळवारी रात्री पुन्हा या दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते कोल्हटकर आळीत एकत्र आले. मिरवणुकीत झालेल्या प्रकाराबाबत शाब्दिक वाद वाढत गेल्याने दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. तलवार, दगड आणि काठीने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कोल्हटकर आळीत एकच हल्लकल्लोळ माजला. आरडाओरडमुळे पेठेतील नागरिक जागे झाले. काहींनी शाहूपुरी, तर काहींनी सातारा शहर पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांची धरपकड केली. दोन्ही गटांतील एकूण २३ जणांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयात त्यांना हजर केले
असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)
मिरवणुकीस मज्जाव!
या वादावादीमुळे दोन्ही मंडळांचा परवाना पोलिसांनी रद्द केला असून, विसर्जनादिवशी या मंडळांनी कसलीही मिरवणूक काढायची नाही. शांततेत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे.
हे कार्यकर्ते झाले गजाआड : शिवाजी सांडगे (वय २३), दिगंबर सांडगे, विजय नलवडे (२६), प्रशांत तोरणे (१९), गणेश अहिवळे (२९), सौरभ जमदाडे (२४), रवी माने (२९), राहुल कटवळे (२२), चेतन गेजगे, विक्रम
आवटे हे सर्वजण मंगळवार पेठेत राहणारे असून, न्यू राजहंस गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत. विजय केंडे, गणेश केंडे, शुभम ढाणे (२३, रा. चिमणपुरा पेठ), मेझशाम केंडे, अतुल बागवान, श्रीकृष्ण पिलावरे (३३), संजय केंडे
(१९), ज्ञानेश्वर नलवडे (४३), प्रसाद नलवडे (२८, सर्व रा. मंगळवार पेठ) हे कार्यकर्ते होलार समाज सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत.