मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले; कार्यकर्ते ताटकळले
By प्रमोद सुकरे | Updated: May 13, 2023 13:18 IST2023-05-13T13:18:15+5:302023-05-13T13:18:41+5:30
शासकीय योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले; कार्यकर्ते ताटकळले
कराड: सत्तासंघर्षावरील निकालानंतर मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आज, शनिवारी प्रथमच सातारा दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होऊन त्यांचे हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा आधी रद्द करण्यात आला. मात्र, दुरूस्तीनंतर ते पुन्हा पाटणकडे रवाना झाले. पण सकाळी १० ३० चा कार्यक्रम असताना दुपारी १:३० पर्यंत ते आलेच नव्हते. त्यामुळे हजारो कार्यकर्ते ताटकळत होते.
सातारा जिल्ह्यातील मरळी (ता. पाटण) येथे 'शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी सातारा आणि पाटणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शासकीय योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर येणार आहेत.
मात्र, हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्याने राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अगोदर त्यांनी दौरा रद्द केला. परंतु, बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा पाटणकडे रवाना झाले आहेत.