मुख्यमंत्री चार दिवसांच्या गाव मुक्कामानंतर मुंबईकडे रवाना

By नितीन काळेल | Published: August 14, 2023 01:11 PM2023-08-14T13:11:31+5:302023-08-14T13:11:50+5:30

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे येथील चार दिवसांच्या गाव मुक्कामानंतर मुंबईकडे रवाना झाले. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ...

Chief Minister Eknath Shinde left for Mumbai after a four day village stay | मुख्यमंत्री चार दिवसांच्या गाव मुक्कामानंतर मुंबईकडे रवाना

मुख्यमंत्री चार दिवसांच्या गाव मुक्कामानंतर मुंबईकडे रवाना

googlenewsNext

सातारा : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे दरे येथील चार दिवसांच्या गाव मुक्कामानंतर मुंबईकडे रवाना झाले. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास कास-सातारामार्गे ते वाहनाने मुंबईकडे वाहनाने गेले. यामुळे सातारा शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबदस्त तैनात होता.

मुख्यमंत्री शिंदे यांचे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब हे गाव आहे. वर्षातून ते अनेकवेळा कुटुंबीयांसह गावी येतात. गुरुवारीही ते गावी आले होते. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर हेलिकाॅप्टरने त्यांचे आगमन झाले होते. यावेळी त्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वागत केले होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर येऊन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ते सातारा-कासमार्गे दरे या गावी गेले होते. मागील चार दिवस त्यांचा गावीच मुक्काम होता. याकाळात त्यांनी बांबू लागवड योजनेचा शुभारंभ केला. तसेच विकासकामांच्यादृष्टीने अधिकाऱ्यांबरोबर बैठकही घेतली.

दरे गावच्या चार दिवसांच्या मुक्कामानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी सकाळी मुंबईकडे रवाना झाले. दरे-कासमार्गे ते सकाळी साडे सहाच्या सुमारास साताऱ्यात आले. त्यानंतर ते वाहनाने पुण्याकडे गेले.

Web Title: Chief Minister Eknath Shinde left for Mumbai after a four day village stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.