Satara: मुनावळे जलपर्यटनाचे भूमिपूजन अन् वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण

By नितीन काळेल | Published: March 7, 2024 06:16 PM2024-03-07T18:16:56+5:302024-03-07T18:20:21+5:30

शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प

Chief Minister Eknath Shinde will visit Satara next Saturday, Various ambitious projects will be launched | Satara: मुनावळे जलपर्यटनाचे भूमिपूजन अन् वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण

Satara: मुनावळे जलपर्यटनाचे भूमिपूजन अन् वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण

सातारा : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे शनिवार, दि. ९ मार्च रोजी जिल्हा दाैऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये मुनावळे येथील जलपर्यटन आणि पाटणमधील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. तसेच दरे येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचेही लोकार्पण होणार आहे.

सातारा जिल्ह्याचे सुपूत्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना गती दिलेली आहे. तसेच नवनवीन प्रकल्पही होत आहेत. विशेषत: करुन पश्चिम भागात अशा महत्वकांकक्षी प्रकल्पाची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांचा मुख्यमंत्री शिंदे सतत आढावा घेत आहेत. याच पध्दतीने आता मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी सातारा जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घघाटनही होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

दरे, ता. महाबळेश्वर येथे साकारण्यात आलेल्या बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार आणि वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. तसेच मुनावळे, ता. जावळी येथे महत्त्वाकांक्षी असा जलपर्यटन प्रकल्प होत आहे. तर पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचेही भूमिपूजन शनिवारीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यातील मुनावळेतील महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प विकसितच्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यातून कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. 

शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प

कोयना धरणापासून उत्तरेस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर शिवसागर जलाशयात मुनावो येथे हा जागतिक दर्जाचा नावीन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प विकसित होत आहे. ४५ कोटी खर्चाच्या या प्रकल्पात पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच जलपर्यटन आणि जलक्रीडा यांचाही समावेश असलेला आणि नदी जलाशयावर होणारा देशातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

Web Title: Chief Minister Eknath Shinde will visit Satara next Saturday, Various ambitious projects will be launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.