मुख्यमंत्री साहेब न्याय द्या, सातारच्या वृध्द धरणग्रस्ताचे अर्धनग्न आंदोलन
By दीपक देशमुख | Published: December 12, 2022 02:31 PM2022-12-12T14:31:39+5:302022-12-12T18:16:05+5:30
एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने जमिनीवर केला आहे कब्जा
सातारा : शासनाने धरणग्रस्त म्हणून दिलेली जमीन एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने कब्जा केला आहे. ही जमीन परत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेद्वाराजवळ ज्येष्ठ नागरिकाने अर्धनग्न आंदोलन केले.
सहदेव रामचंद्र अंबवले वय : ८४ वर्षे पुनर्वसनग्रस्त असून त्यांना शासनाने १९७९ मध्ये कोंडवली (पुनर्वसित) पो. रहिमतपूर, ता. कोरेगांव जमीन दिली होती. या जमिनीवर १९९२ पासून निवृत्त शासकीय अधिकारी यांनी कब्जा केला आहे. ही जमिन परत मिळावी म्हणुन प्रशासनाकडे गेली ३० वर्षे त्यांचा संघर्ष सुरू आहे.
आज, सोमवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री साहेब मला न्याय द्या अशी. आर्त साद घातली आहे.