साताºयात आज मुख्यमंत्री, शरद पवारांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:49 AM2019-04-20T11:49:55+5:302019-04-20T11:51:35+5:30

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शनिवार, दि. २० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताºयात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहे.

Chief Minister, Sharad Pawar's meeting today | साताºयात आज मुख्यमंत्री, शरद पवारांची सभा

साताºयात आज मुख्यमंत्री, शरद पवारांची सभा

Next
ठळक मुद्देराजवाड्याजवळील गांधी मैदानावर त्यांची सभा दुपारी दोन वाजता सुरू होणार

सातारा : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शनिवार, दि. २० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताºयात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी आदल्या दिवसापासूनच सभास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस उरले असताना दिग्गज नेत्यांच्या सभांचा सपाटा सुरू आहे. याला साताराही अपवाद नाही. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताºयात येत आहेत. राजवाड्याजवळील गांधी मैदानावर त्यांची सभा दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा जिल्हा परिषदेच्या मैदानावर दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. एकाचवेळी दोन दिग्गज नेते साताºयात येणार असल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. आदल्या दिवशीच पोलिसांनी साताºयात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

Web Title: Chief Minister, Sharad Pawar's meeting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.