मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना समजावून सांगावे, नाहीतर..; लक्ष्मण मानेंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 04:23 PM2022-04-18T16:23:47+5:302022-04-18T16:25:34+5:30

राज ठाकरे यांनी देश, समाजासाठी काय केले ? ते नकलाच करतात. भोंग्यावरुन बोलतात. हे भोंगे आता लागले आहेत का ? ‘कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे हे काम करत आहेत. आजोबांकडून त्यांनी काही तरी शिकायला हवे होते.

Chief Minister should explain to Raj Thackeray, Laxman Mane gave a warning | मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना समजावून सांगावे, नाहीतर..; लक्ष्मण मानेंनी दिला इशारा

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना समजावून सांगावे, नाहीतर..; लक्ष्मण मानेंनी दिला इशारा

Next

सातारा : ‘मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठिशी मूठभर वर्ग सोडला तर कोणी नाही. त्यांच्याकडून दोन धर्मात द्वेष पसरविण्याचेच काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाला समजावून सांगावे. नाहीतर त्यांना अटक करावी. त्याचबरोबर गरज पडल्यास राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करेन,’ असा इशारा ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी दिला आहे.

सातारा येथील शासकीय विश्रामृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने म्हणाले, ‘२१ एप्रिलपासून ‘आम्ही भारतीय लोक’ हे अभियान सुरु करत आहे. साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन हे अभियान सुरु होईल. त्यानंतर राज्यभरात हे अभियान चालविणार आहे. यामूधन हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्यांना आव्हान दिले जाईल.

त्याचबरोबर संविधानावर आक्रमण करुन भाजपने धुडगूस घातला आहे. यालाही थांबविण्याची गरज आहे. कारण, हिंदू राष्ट्र कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही. भाजपनेही लोकांची फसवणूक करण्याचा धंदा बंद करावा.

भोंग्याला हात लावाल तर..

राज ठाकरे यांनी देश, समाजासाठी काय केले ? ते नकलाच करतात. भोंग्यावरुन बोलतात. हे भोंगे आता लागले आहेत का ? ‘कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे हे काम करत आहेत. आजोबांकडून त्यांनी काही तरी शिकायला हवे होते. भोंग्याला हात लावाल तर त्याला प्रतिकार करण्यात येईल. कारण, देशात आज १९४८ साला सारखी परिस्थिती आहे. संघाला देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का ? असा सवालही माने यांनी पत्रकार परिषदेत केला.

Web Title: Chief Minister should explain to Raj Thackeray, Laxman Mane gave a warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.