एकनाथ शिंदे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री; शंभूराज देसाईंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

By प्रमोद सुकरे | Published: August 28, 2022 02:34 PM2022-08-28T14:34:27+5:302022-08-28T14:35:06+5:30

Shambhuraj Desai : राज्यात १ लाख८२ हजार शासकीय व निमशासकीय पदे रिक्त आहेत.  यावर्षी भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे रिक्त पदापैकी ७५ हजार पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

Chief Minister walking down Eknath Shinde Street; Slam Uddhav Thackeray without mentioning Shambhuraj Desai's name | एकनाथ शिंदे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री; शंभूराज देसाईंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री; शंभूराज देसाईंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

Next

प्रमोद सुकरे

कराड :  राज्याचे जुने मुख्यमंत्री आमचेच होते; पण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हवाई सफर जास्त आवडत नाही असा टोला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला व  मुख्यमंत्री शिंदे यांचा चांगला दौरा लवकरच पाटण तालुक्यात होईल, असेही मंत्री देसाई यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. 

गत अडीच वर्षात राज्य सरकार तिजोरीत पैसे नाहीत असे सांगत  होते. त्यातही तुम्ही  मंत्री होता. पण सध्या निधीच्या घोषणा जोरात होत आहेत? पैसे कोठुन आले? याबाबत छेडताच ते म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात त्यांनी १९ हजार कोटी रुपये निधी निती आयोगाच्या माध्यमातून राज्याला त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवर प्राधान्याने खर्च करण्याची गरज आहे. त्यावर आम्ही खर्च करीत आहोत.

राज्यात १ लाख८२ हजार शासकीय व निमशासकीय पदे रिक्त आहेत.  यावर्षी भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे रिक्त पदापैकी ७५ हजार पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Chief Minister walking down Eknath Shinde Street; Slam Uddhav Thackeray without mentioning Shambhuraj Desai's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.