मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:31 PM2019-01-03T12:31:57+5:302019-01-03T12:56:24+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे गुरुवारी सकाळी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दहाला येणार होते; परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. तोपर्यंत जिल्ह्यातील नेत्यांना त्यांची वाट पाहावी लागली.
सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे गुरुवारी सकाळी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दहाला येणार होते; परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. तोपर्यंत जिल्ह्यातील नेत्यांना त्यांची वाट पाहावी लागली.
नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी सकाळी निघणार होते. पण हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आल्यावर पायलटने मुख्यमंत्री व संबंधित यंत्रणेला त्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना मुंबईतच थांबावे लागले.
मुख्यमंत्री सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी हेलिकॉप्टरमधून रवाना झाले. शिरवळ येथील विश्रांतीगृहावर मंत्री राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, सदाभाऊ खोत वाट पाहत होते.