मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:51+5:302021-06-11T04:26:51+5:30
सातारा : अनेक दिवसांपासून घरात कोंडून राहिलेली शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुले घराबाहेर पडू लागले आहेत. लॉकडाऊन शेतीतील होताच विहिरी, ...
सातारा : अनेक दिवसांपासून घरात कोंडून राहिलेली शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुले घराबाहेर पडू लागले आहेत. लॉकडाऊन शेतीतील होताच विहिरी, तलाव नद्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळते. कास रस्त्यावर उत्साहाच्या भरात पोहायला गेलेल्या एका मुलाला जीव गमवावा लागला. हे भीषण वास्तव लक्षात घेऊन पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
..........
महामार्गावर खड्डे
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर पाचवड ते वाडे फाटा दरम्यान रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असून वाहनधारकांची चा जीव धोक्यात आला आहे. महामार्ग प्राधिकरणाने पावसाळ्याआधी रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
.............
सायंकाळी पाचनंतरही बाजारपेठेत गर्दी
सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सायंकाळी ५ नंतर जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी आहे. सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात उठवले. मात्र, सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे, तरीदेखील सातारा शहरातील बाजारपेठेमध्ये सायंकाळी पाच नंतरदेखील सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत होती.