भंगार वेचणाऱ्या मुलांच्या हाती आली पाटी अन् पेन्सील -अजित बल्लाळ यांची जिद्द शालाबाह्य वीस मुले शिक्षणाच्या प्रवाहात:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:13 AM2018-09-05T00:13:56+5:302018-09-05T00:18:02+5:30
सकाळ झाली की भंगार वेचणं अन् मिळालेल्या पैशातून पोट भरणं एवढाच त्या चिमुकल्यांचा दिनक्रम. परिस्थितीशी झगडणाºया या मुलांना शिक्षणाचा जराही गंध नव्हता. मात्र, लिंब-गोवे येथे राहणाºया एका शिक्षकाने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
सचिन काकडे ।
सातारा : सकाळ झाली की भंगार वेचणं अन् मिळालेल्या पैशातून पोट भरणं एवढाच त्या चिमुकल्यांचा दिनक्रम. परिस्थितीशी झगडणाºया या मुलांना शिक्षणाचा जराही गंध नव्हता. मात्र, लिंब-गोवे येथे राहणाºया एका शिक्षकाने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. या प्रयत्नांना आता यश आलं असून, भंगार वेचणारी ती मुलं हाती पाटी-पेन्सील घेऊन ज्ञान अर्जित करू लागली आहेत. अजित बल्लाळ असे या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव आहे.
अजित बल्लाळ येथे साताºयातील पालिकेच्या शाळा क्रमांक १६ मध्ये कार्यरत आहे. पहिली ते सातवीपर्यंत या शाळेत एकूण १८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा अवलंब करून अजित बल्लाळ गुणवत्तावाढीसाठी शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवितात. सामान्य ज्ञान असो की गणिती क्रिया अॅकरेलिक बोर्डचा वापर करून साध्या सोप्या भाषेत ते विद्यार्थ्यांना शिकवितात. एकीकडे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत असताना शालाबाह्य मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, अशी कल्पना त्यांना मनात घर करून गेली आणि त्यांनी ती सत्यात उतरविली.
सातारा शहर व परिसरात अनेक लहान मुले त्यांना भंगार वेचताना आढळून आली. या मुलांना काही करून शाळेत दाखल करायचे, असा निर्धार त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी मुलांच्या घरी जाऊन प्रथम आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्याकडून होकार मिळताच बल्लाळ यांनी भंगार वेचणाºया मुलांना वयोगटानुसार ज्या-त्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. आतापर्यंत एकूण वीस मुले त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत. या मुलांना शिक्षण देण्याबरोबरच गरजेनुसार त्यांना शैक्षणिक साहित्यही ते स्वत: उपलब्ध करतात. ‘भंगार वेचणारे हात आता शब्दांशी खेळू लागले आहेत. याचं त्यांच्या निरक्षर आई-वडिलांनाही आता अप्रूप वाटू लागलं आहे.
अनाथ मुलांना नेहमीच मदतीचा हात
ज्या मुलांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे, अशी काही मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या मुलांनाही गरजेनुसार शैक्षणिक मदत करण्याचे काम अजित बल्लाळ करतात. एकीकडे पालिका शाळांचा पट खालावत असताना दुसरीकडे शालाबाह्य व गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून पट टिकवून ठेवण्याचे कामही अजित बल्लाळ निरंतर करीत आहेत.
भंगार वेचणाºया मुलांना आता शिक्षणातून व्यवहारज्ञान समजू लागले आहे. काही मुलं आजही भंगार गोळा करतात आणि वेळेनुसार शाळेत येतात. शिक्षणाप्रती त्यांच्यामध्ये थोडी का होईना गोडी निर्माण होत आहे. मुलांना घडविण्याचे काम कठीण असले तरी अशक्य मुळीच नाही. हे काम पुढे सुरूच ठेवणार आहे.
- अजित बल्लाळ, शिक्षक