कोरड्या तलावासाठी पालिकेत बालकांची जलक्रीडा

By admin | Published: March 30, 2015 10:49 PM2015-03-30T22:49:15+5:302015-03-31T00:20:13+5:30

शिवसेनेचे ‘अंघोळ घालो’ आंदोलन : पोहोण्याच्या तलावाची दुरुस्ती करून खुला करण्याची मागणी

Children's drinking water for a dry lake | कोरड्या तलावासाठी पालिकेत बालकांची जलक्रीडा

कोरड्या तलावासाठी पालिकेत बालकांची जलक्रीडा

Next

सातारा : उन्हाळ्याची सुटी म्हटलं की पाण्यात मनसोक्त डुंबावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण आता नदी, विहिरी पूर्वीसारख्या खळाळत नाहीत. कमी पर्जन्यमानामुळं नदीपात्रात पाण्याचा ठिपूसही नजरेस पडत नाही. पिण्याच्या पाण्याची जिथं ओरड, तिथं पोहोण्यासाठी पाणी कुठून येणार? अशावेळी मुलांना पोहोण्याचा आनंद मिळविण्यासाठी हक्काचं एकमेव ठिकाण होतं ते नगरपालिकेचा पोहोण्याचा तलाव. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा तलाव नादुरुस्त असून बंद आहे. या तलावाची दुरुस्ती करून मुलांना पोहोण्यासाठी खुला करावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी नगरपालिकेच्या पायरीवर मुलांना अंघोळ घालून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देण्यात आले. उपतालुकाप्रमुख हरिदास मोरे, ज्ञानेश्वर नलवडे, आतिष ननावरे, विभागप्रमुख नंदू केसरकर, रोहिदास वाघ, उपशहरप्रमुख प्रवीण शहाणे, रमेश बोराटे, मंगेश जाधव, संतोष शेलार, बापू तोरस्कर, राजू शेडगे, सागर दयाळ, संतोष शेंडे, बापू नलावडे, दत्ता नलावडे, मनोज नलावडे, अजित नलावडे, बबन फाळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


मुख्याधिकाऱ्यांची पळापळ
शिवसेनेच्या वतीने पालिकेत ‘अंघोळ घालो आंदोलन’ सुरू असल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आपल्या केबिनमध्ये बसून न राहता आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी किशोर पंडित यांनी बापट यांना निवेदनाची प्रत देऊन पोहोण्याचा तलाव दुरुस्त करून त्वरित खुला करावा, अशी मागणी केली. त्यानंतर बापट यांनी तो अधिकार मला नाही, असे सांगितले. यावर पंडित यांनी आक्रमक भूमिका घेत ही बाब तुमच्या अधिकारात येते. परंतु तुम्ही हात झटकत आहात, असा आरोप करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. यावर बापट यांनी हा विषय सर्व नगरसेवकांनी सभेत उपस्थित केल्यास तसा प्रस्ताव पुढे पाठविता येईल, असे सांगितले.


नगराध्यक्षांच्या गाडीलाही अंघोळ
‘अंघोळ घालो आंदोलन’ झाल्यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आंदोलक पालिकेबाहेर पडत असतानाच गेटसमोर लावलेल्या नगराध्यक्षांच्या गाडीलाही बादलीभर पाण्याने आंघोळ घालून घोषणाबाजी करण्यात आली.


घरच्या बादलीत
पालिकेचे पाणी!
गेल्या चार दिवसांपासून या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची तयारी सुरू होती. या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी घरूनच बादल्या आणल्या होत्या. पालिका गेटवर असणाऱ्या नळाचे पाणी बादलीत भरून मुलांना अंघोळ घालण्यात आली.

Web Title: Children's drinking water for a dry lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.