चोराडे फाटा बसथांब्याला ‘पंढरपूर फाटा’ नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:48+5:302021-05-17T04:37:48+5:30
पुसेसावळी : गेल्या दोन वर्षांपासून विटा-महाबळेश्वर रस्त्याचे काम सुरु असून, चोराडे गावाजवळचे काम अंतिम टप्प्यात पूर्णत्वाकडे चालले आहे. मात्र, ...
पुसेसावळी : गेल्या दोन वर्षांपासून विटा-महाबळेश्वर रस्त्याचे काम सुरु असून, चोराडे गावाजवळचे काम अंतिम टप्प्यात पूर्णत्वाकडे चालले आहे. मात्र, गावाजवळील चोराडे फाटा येथे या रस्त्याच्या ठेकेदाराने ‘पंढरपूर फाटा’ असे नाव दिल्याने अजब कारभार उजेडात आला आहे.
या ठेकेदाराने चोराडे फाटा बसस्टॅण्डला चक्क ‘पंढरपूर फाटा’ असे नाव दिल्यामुळे येथील वाहनचालकांची चांगलीच फसगत होत आहे. त्यामुळे या बसस्थानकाचे नाव तातडीने बदलून चोराडे फाटा असे करावे. अन्यथा चोराडे ग्रामस्थांकडून या लाॅकडाऊनच्या काळात आंदोलन करण्यात येईल. या सर्व घटनेला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. चोराडे गावातील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ‘बघतो... करतो’ अशी उत्तरे दिली जात आहेत. त्याठिकाणी दोन स्टँड आहेत. तुमच्या गावासाठी एक आहे. दुसरे पंढरपूर फाट्यासाठी आहे, अशी उत्तरे देऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. त्यामुळे या स्टॅण्डवरील नाव ताबडतोब बदलून चोराडे फाटा करावे, अशी मागणी चोराडे ग्रामस्थांकडून केली जात आहे.
चौकट :
रस्ता रुंद झाल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहनचालकांना हा नक्की कोणता फाटा हे कळत नसल्याने पुढे चार - पाच किलोमीटर जावे लागत आहे. हा नाहक त्रास या स्टॅण्डवरील बोर्डमुळे होत आहे.
===Photopath===
160521\img_20210511_094118.jpg
===Caption===
विटा महाबळेश्वर रस्त्यावरील चोराडे गावच्या हद्दीत असलेल्या स्टँडला चुकीच्या नावामुळे वाहन चालकांची फसगत