चोराडे आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था
By admin | Published: July 12, 2017 03:52 PM2017-07-12T15:52:31+5:302017-07-12T15:52:31+5:30
स्थानिक रुग्णांनी पाठ फिरवली
आॅनलाईन लोकमत
पुसेसावळी (जि. सातारा), दि. १३ : चोराडे, ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची मोठी दुरवस्था झाली आहे. तसेच या उपकेंद्रात सध्या एकच आरोग्य सेविका आहे. अशा कारणांमुळे स्थानिक रुग्णांनी या उपकेंद्राकडे पाठ फिरवली आहे.
चोराडे येथील हे आरोग्य उपकेंद्र रुग्णांसाठी महत्वूपर्ण आहे. आसपासच्या गावांतील रुग्ण येथे येत असतात. हे आरोग्य उपकेंद्र गावाच्या एका बाजुला असून याची खिडकी, दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच या उप केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या उपकेंद्रातील कंपाउंडही तुटले असून इथल्या स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला सांगूनही याची दुरुस्ती झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी होत आहे.
चोराडेमधील आरोग्य उपकेंद्रात एक स्थायिक डॉक्टर मिळावा. तसेच उपकेंद्रामध्ये असणाऱ्या खिडक्या, दरवाजे लवकरात लवकर बसवावेत.
श्रीकांत पिसाळ,
ग्रामपंचायत सदस्य
चोराडेतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या उपकेंद्राच्या दुरुस्तीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. - संदिप मांडवे,
सभापती पंचायत समिती