कऱ्हाड, पाटण, कोरेगावात ‘अर्थ-शिक्षण’साठी चुरस

By Admin | Published: March 29, 2017 11:38 PM2017-03-29T23:38:37+5:302017-03-29T23:38:37+5:30

बारामतीची अपेक्षा : आमदारांनी आपापसांत चर्चा करून निर्णय घ्यावा

Churus for 'semantics' in Karhad, Patan, Koregaon | कऱ्हाड, पाटण, कोरेगावात ‘अर्थ-शिक्षण’साठी चुरस

कऱ्हाड, पाटण, कोरेगावात ‘अर्थ-शिक्षण’साठी चुरस

googlenewsNext



सातारा : जिल्हा परिषदेतील शिक्षण, अर्थ या समितीला विशेष दर्जा आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्यांनी आता या समितीवर निवड व्हावी, यासाठी आग्रह धरला आहे. कऱ्हाड, पाटण, कोरेगाव या तीन तालुक्यांतील चर्चेत असणाऱ्या सदस्यांमध्ये सध्या चुरस पाहायला मिळते आहे.
जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी जितकी उत्सुकता होती, तितकीच सभापती निवडीचीही उत्सुकता ताणली गेली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ६४ पैकी ४० सदस्य निवडून आले आहेत. सभापती निवडी १ एप्रिल रोजी आहेत. गुरुवारीही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते तालुक्यांचा ‘बॅलन्स’ कसा साधतात याची उत्सुकता आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षण व अर्थ, कृषी, समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण या चार समित्यांचे सभापती निवडीच्या हालचाली सध्या गतिमान आहेत. महिला व बालकल्याण समितीवर दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्नुषा भारती पोळ यांना संधी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या सर्वच नेतेमंडळींचे एकमत झाले आहे. परंतु इतर तीन समित्यांसाठी वाई, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण या मतदार संघांतील आमदारांनी जोर लावला आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी जिल्ह्यातील आमदारांची मुंबईत बैठक घेतली. १२ सदस्यांना आपण सभापतिपदांवर संधी देऊ शकतो, याचा पुनरुच्चार आमदार पवार यांनी या बैठकीत केला. फलटणला अध्यक्षपद, सातारा-जावळीला उपाध्यक्षपद मिळाले असल्याने या दोन तालुक्यांतून नेत्यांचा आग्रह थांबला आहे. माण तालुक्यालाही सभापतिपद निश्चितपणे मिळणार आहे. मात्र, कऱ्हाड, वाई, कोरेगाव, पाटण या मतदार संघांनाही संधी देण्यासाठी आमदार मंडळी या बैठकीत आग्रही राहिले.
आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी यासाठी जोर लावला आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ही महत्वपूर्ण बैठक सुरू राहिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मतदार संघातील इच्छुक सदस्यांना सभापतिपद मिळावे, यासाठी सर्वच आमदार आग्रही राहिले. शेवटी आमदारांनी आपापसांत चर्चा करून बारामतीला निर्णय कळवावा, अशी सूचना आमदार पवार यांनी केली. बारामतीतून खासदार शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Churus for 'semantics' in Karhad, Patan, Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.