दुष्काळ निधी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:54 AM2017-08-03T00:54:35+5:302017-08-03T00:54:35+5:30

CID inquiry into the drought fund scam | दुष्काळ निधी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

दुष्काळ निधी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माण, खटाव पीक नुकसान अनुदानात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यातील दोषी अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सीआयडी चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन पक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली.
सातारा जिल्ह्यात दुष्काळाने होरपळणाºया तालुक्यांसाठी आलेल्या दुष्काळ निधीत कोट्यवधींचा घोटाळा ही संतापजनक बाब असून या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.
जाधव म्हणाले, दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना सरकारने केलेली मदत ही शेतकºयांपर्यंत न पोहोचता त्याचा मलिदा लाटण्याचे काम झाले आहे. हा मलिदा लाटण्यामध्ये अधिकारी असल्याचे समोर येत आहे. खटाव तालुक्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण, खंडाळा, माण या दुष्काळी तालुक्यातही अशा प्रकारचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. स्थानिक राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा घोटाळा होऊच शकत नाही. यात राजकीय मोठे मासे असण्याची शक्यता असल्याने या घोटाळ्याची चौकशी अधिकाºयांपुरती मर्यादित न ठेवता या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून खºया सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्याच्या विकास निधीमध्ये पहिल्यापासूनच दुष्काळी तालुके असल्याचे कारण पुढे करत भरमसाठ निधी दुष्काळी तालुक्यात वळविला जातो; परंतु वारंवार असे दिसून आले आहे की, हा निधी नेमका त्या त्या कारणासाठी त्या भागात खर्च होत नाही. त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे. अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून स्वत:ची घरे भरण्याचा उद्योग करणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अर्जुनराव साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष राजू शेळके, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, सुकाणू समितीचे अध्यक्ष अलीभाई इनामदार, कºहाड तालुकाध्यक्ष देवानंद पाटील, उपाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, कºहाड दक्षिण अध्यक्ष सचिन नलवडे, जीवन शिर्के, संजय साबळे, आस्लम फरास, हणमंत मोरे, सचिन मोरे, अनिल साळुंखे, दीपक चव्हाण, जनार्दन आवारे, सुनील साळुंखे, आनंद फडके, कल्याण जगताप, गणेश लांडगे, बाळकृष्ण शेडगे, बाळकृष्ण चव्हाण, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
लाटलेला निधी तहसीलदारांच्या परिवाराकडे
सातारा : खटाव तालुक्याच्या दुष्काळी जनतेसाठी आलेला निधी तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळे यांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने लाटला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली. आमदार शिंदे म्हणाले, ‘दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारसह विरोधकही प्रयत्न करत आहे. यासाठी मोठा निधी मंजूर केला जात आहे. मात्र, निधीचा गैरवापर करण्याचे पाप काही अधिकारी करत आहेत. दुष्काळी जनतेसाठी मंजूर केलेल्या निधीवर अधिकाºयांनी डल्ला मारला आहे. अडीच कोटी रुपयांचा अपहार करताना तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळे यांनी मित्र आणि परिवाराच्या बँक खात्यांचा वापर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी.’

Web Title: CID inquiry into the drought fund scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.