विक्रेत्यांची सर्कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:37+5:302021-02-12T04:37:37+5:30

सातारा : राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर फळ विक्रेते बसलेले असतात. याबाबत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे वाहन आले, तर विक्रेते ...

Circus of vendors | विक्रेत्यांची सर्कस

विक्रेत्यांची सर्कस

Next

सातारा : राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर फळ विक्रेते बसलेले असतात. याबाबत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे वाहन आले, तर विक्रेते इतरत्र पळून जातात. वाहन गेले की पुन्हा रस्त्यावर येतात. त्यांची दिवसभर ही सर्कस सुरूच असते. पण मंडईत जाण्याची मानसिकता होत नाही.

०००००००

खड्ड्यामुळे धोका

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र बसस्थानकाकडे जाणारा भुयारी रस्ता संपतो तेथेच मोठमोठे दोन-तीन खड्डे पडले आहेत. या ठिकाणी सुसाट वाहने अचानक खड्डा अडवा आल्यानंतर तो चुकविण्यासाठी वाहने आडवी-तिडवी नेत असतात. पाठीमागून आलेल्या वाहनचालकांची फसगत होत असते. यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे.

०००००

दुचाकींची घसरगुंडी

सातारा : साताऱ्यातील अनेक भागात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मात्र त्यासाठीची वाळू रस्त्यावरच साठ केला जातो. मात्र काम झाल्यानंतर पडलेली वाळू तशीच पडून असते. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहे. सायकलही पडत आहेत.

०००

मैदान फुलले

सातारा : कोरोनानंतर मार्चपासून मैदाने खेळासाठी बंद ठेवली होती. आता निर्बंध हटत असल्याने मुलंही मैदानावर खेळासाठी जात आहेत. शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर दररोज सायंकाळी मोठ्या संख्येने मुलं खेळण्यासाठी जात असतात. त्यामुळे मैदाने फुलली आहेत.

००००००

उरमोडी नदीवर पूल बांधण्याची मागणी

सातारा : साठेवाडीनजिक उरमोडी नदीवर पूल बांधण्याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उरमोडी पूल समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, सदस्य जगन्नाथ कदम, राजकुमार पाटील, संकेत माने यांनी हे निवेदन दिले. यामध्ये अनेक कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

०००००

वाहनांमुळे ध्वनीप्रदूषण

सातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाजवळ कोल्हापूरकडून येणारा रस्ता अरुंद होत असतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. प्रत्येकालाच पुढे जायची घाई असते. त्यामुळे वाहनचालक या ठिकाणी मोठमोठ्याने हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण होत असते.

०००००

ग्रामीण भागात गाड्या

सातारा : कोरोना काळात एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर दिवाळीत एसटी सुरू झाली; पण शाळा-महाविद्यालयेच बंद असल्याने ग्रामीण भागात एसटी जात नव्हती. आता राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या ग्रामीण व दुर्गम भागातही धावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची सोय होत आहे.

Web Title: Circus of vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.