मलकापुरात तरुणावर प्राणघातक हल्ला; शेकडो नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 12:40 PM2021-12-16T12:40:00+5:302021-12-16T12:40:48+5:30

लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल, बुधवारी चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले होते. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Citizens attack police station in protest of deadly attack on youth in Malkapur | मलकापुरात तरुणावर प्राणघातक हल्ला; शेकडो नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक

मलकापुरात तरुणावर प्राणघातक हल्ला; शेकडो नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक

Next

मलकापूर : लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल, बुधवारी चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले होते. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संशयित हल्लेखोर हे वारंवार शहरात दहशत माजवत आहेत. त्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासह मलकापूरातील गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत मलकापूरमधील शेकडो नागरिकांनी आज, गुरुवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.

मलकापुरातील मुख्य चौकात काल, बुधवारी भरदिवसा युवकांच्या टोळक्याने एकावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला. शहरातील मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल घेत मलकापूरातील आशा गुंड प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी गुरूवारी मलकापूरातील शेकडो नागरीक एकत्र आले. एकत्र आलेल्या शेकडो नागरिकांनी थेट कराड शहर पोलिस ठाणे गाठले.

शहरात गुंड प्रवृत्तीची टोळकी तयार झाली आहेत. लहान मुलांना धमकावून भीती घालत आहेत. यापूर्वीही संशयितांनी हल्ला करून युवकाच्या हाताची बोटे तोडली होती. संशयित वारंवार शहरात दहशत माजवत असून त्यांच्या गुंडगिरीला वेळीच पायबंद घालणं गरजेचे आहे. अशी मागणी करत पोलिस अधिकाऱ्यांसमोर गऱ्हाणे मांडले.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना दिले. त्यानंतर बी. आर. पाटील यांनी कायद्यानुसार संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. संशयितांना अटक करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील हे स्वतः या गुन्ह्याचा तपास करत आहेत. असे सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात जमलेला जमाव शांत झाला.

Web Title: Citizens attack police station in protest of deadly attack on youth in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.