इंदिरानगर भागात मैला प्रकल्पास नागरिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:38+5:302021-06-24T04:26:38+5:30
लोणंद : येथील प्रभाग क्रमांक चारमधील इंदिरानगर भागात लोकवस्तीतील नगरपंचायतीने स्थानिक नागरिकांची कसलीही संमती न घेता या भागात मैला ...
लोणंद : येथील प्रभाग क्रमांक चारमधील इंदिरानगर भागात लोकवस्तीतील नगरपंचायतीने स्थानिक नागरिकांची कसलीही संमती न घेता या भागात मैला प्रकल्प उभारला जात असल्याने या प्रकल्यास या भागातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
या प्रकल्प उभारण्याबाबत नागरिकांना विचारात न घेता व या प्रकल्पाची माहिती अंधारात ठेवून हा प्रकल्प उभारण्यात येत असून, या मैला प्रकल्पामुळे सभोवतालच्या रहिवासी वसाहत, शाळा याठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन मोठी हानी होणार असल्याने प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांनी एकत्र येऊन या मैला प्रकल्पास विरोध दर्शवत हा प्रकल्प त्वरित रद्द करावा, अशी मागणी केली आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण असल्याने या प्रकल्पाचे काम न थांबल्यास तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा देण्यात आला असून चाळीस नागरिकाच्या सह्यांचे निवेदन नगरपंचायतीस देण्यात आले. यावेळी भूषण खरात, कय्यूम मुल्ला, बबलूभाई सय्यद, राजेश म्हेत्रस, गणेश माने, हेमंतआप्पा पवार, बाळा पवार, रशीद आतार, मोहसीन शेख, बाबू बेंगळे, शाहनवाज पानसरे आदी नागरिक उपस्थित होते.