वडूज लसीकरण केंद्रात परगावचे नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:39 AM2021-05-23T04:39:22+5:302021-05-23T04:39:22+5:30

वडूज : येथील ग्रामीण रुग्णालयांसह अनेक ठिकाणी लसीकरणाचा फज्जा उडत आहे. यामध्ये परगावचे लोक लसीकरणाला कसे, हाच कळीचा ...

Citizens of Pargaon at Vadodara Vaccination Center | वडूज लसीकरण केंद्रात परगावचे नागरिक

वडूज लसीकरण केंद्रात परगावचे नागरिक

Next

वडूज : येथील ग्रामीण रुग्णालयांसह अनेक ठिकाणी लसीकरणाचा फज्जा उडत आहे. यामध्ये परगावचे लोक लसीकरणाला कसे, हाच कळीचा मुद्दा उपस्थित होत आहे. ऑनलाईन नोंदणीबरोबर जाग्यावरच नोंदणी अनेकजण करत नाहीत. नोंदणी नसलेल्या लोकांची संख्या जास्त असल्याने व ऑनलाईन ॲपमधील वारंवार बदलांमुळेही गैरसमज होऊन वारंवार खटके उडत आहेत. लसीचा तुटवडा व नियोजनशून्य कारभारांमुळे लोकांची ससेहोलपट होत आहे.

कोरोनाचा विस्फोट झाल्याने शासन स्तरावरून सुरुवातीला पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर अठरा तेच चव्वेचाळीस दरम्यानच्या व्यक्तींना लसीकरणाची परवानगी देण्यात आली. लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने तुटवडा जाणवू लागला. त्यानंतर शासनाने अठरा ते चव्वेचाळीस वयोगटाचे लसीकरण थांबवले. सुरुवातीला लस घेण्यास अनेकजण उत्सुक नव्हते, पण झपाट्याने वाढत गेलेला रुग्णांचा आकडा व वाढता मृत्युदर यामुळे लसीकरण केद्रांवर गर्दी वाढू लागली. लसीकरणासाठी शासनाने ऑनलाईन सुविधा केली. सुरुवातीला लसीकरण केंद्रावरच नोंदणी करण्यात येत होती, पण लसीकरण वाढल्याने नोंदणी खुली करून स्वतः अथवा इतरत्र होऊ लागली.

लसीकरणाला येणाऱ्या वृद्ध लोकांकडे साधा मोबाईलसुद्धा नाही. अनेकजण कागदावर नंबर लिहून आणत आहेत. तसेच ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्याचे सेशन नोंदणी करणे गरजेचे आहे. याबाबत ग्रामीण भागात अजूनही म्हणावी इतकी जागृती नसल्याने मोठी फसगत होत आहे. लसीकरणासाठी सत्तर टक्के कोटा सेशन नोंदणीकरणांसाठी राखीव आहे. तसेच सेशन ओपन झाल्यावर लसीकरण केंद्राची नावे येत असून आपले जवळचे ठिकाण निवडायचे आहे. सर्व काही ऑनलाईन दिसत असल्याने वडूज विभागाव्यतिरिक्त शेजारच्या तालुक्यातील लोकही नोंदणी करत आहेत.

दुसऱ्या डोससाठी वारंवार बदल होत आहेत. पूर्वीचा अठ्ठावीस दिवसांचा कार्यकाल बेचाळीस दिवसांवर केला. आता ॲपमधील सुधारित बदल करून दुसऱ्या डोसचा कालावधी ८४ दिवसांवर केल्याने गोंधळात गोंधळ निर्माण होऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना वादावादीचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमुळे जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरेतुरेची भाषा केली जाते. प्रसंगी पोलिसांना पाचारण करावे लागत आहे.

दोन डोसमधील अंतरातील बदल डोकेदुखी.....

दुसऱ्या डोससाठी अंतरात वारंवार बदल होत आहेत. पूर्वीचा २८ दिवसांचा कार्यकाल ४२ दिवसांवर नेला. आता ॲपमधील सुधारित बदल करून दुसऱ्या डोसचा कालावधी ८४ दिवसांवर केल्याने गोंधळात गोंधळ निर्माण होऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना वादावादीचा सामना करावा लागत आहे.

फोटो २२शेखर जाधव

वडूज ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. (छाया : शेखर जाधव )

===Photopath===

220521\img-20210522-wa0035.jpg

===Caption===

फोटो: वडूज ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी झालेली तुडुंब गर्दी. ( शेखर जाधव )

-------

Web Title: Citizens of Pargaon at Vadodara Vaccination Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.