फलटण शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:53+5:302021-05-30T04:29:53+5:30
फलटण : फलटण शहरातील नागरिक महामारीमुळे त्रस्त असल्याने त्यांची घरपट्टी माफ करावी व व्यापारी लाॅकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने ...
फलटण :
फलटण शहरातील नागरिक महामारीमुळे त्रस्त असल्याने त्यांची घरपट्टी माफ करावी व व्यापारी लाॅकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे गाळे भाडे माफ करा, अशा मागणीचे निवेदन शनिवारी मुख्याधिकारी यांना नगरपालिकेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांकडून देण्यात आले.
यावेळी नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, गटनेते अशोक जाधव, नगरसेवक अनुप शहा, नगरसेवक सचिन अहिवळे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष वसीम मनेर, माजी नगरसेवक जाकीरभाई मणेर, राजेश हेंद्रे उपस्थित होते.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनामध्ये गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे नागरिकांना हाताला काम नाही. व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत असल्याने यावर्षीचे घरपट्टी सरसकट माफ करण्यात यावी तसेच नगरपरिषदेचे भाडेकरू असलेल्या व्यापाऱ्यांचे गाळा भाडे सरसकट माफ करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.