लसीकरणासाठी जिंतीमध्ये नागरिकांची झुंबड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:54+5:302021-04-10T04:38:54+5:30
जिंती : फलटण तालुक्यातील कोरोना वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले ...
जिंती : फलटण तालुक्यातील कोरोना वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले आहे.
साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जिंती ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे; परंतु लसीकरण करून ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक केले आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. नेटवर्किंग नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गर्दीचे प्रमाणात वाढत दिसून येत आहे. लसीकरण नोंदणी ऑनलाइन न करता ऑफलाइन करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होईल. जास्त वेळ जाणार नाही.
कोरोना रोगाने जवळपास एक वर्षापासून थैमान घातले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या वाढत असल्याने साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद व उपकेंद्र जिंती यांनी कोरोना लसीकरण परिसरातील ग्रामीण भागामध्ये सुरू केले आहे. तसेच जिंती ग्रामपंचायत हाॅलमध्ये कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरणासाठी गावातील ४५ वर्षांवरील व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. मोहिमेत तब्बल १६० नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
आरोग्य विभागाचे डॉ. एस. ए. कदम, आरोग्य सहायक एम. जे. कांबळे, आरोग्य सेवक डी. ए. साळुंखे, आरोग्य सेविका यू. डी. गवळी, एस. एस. माने, आशा सेविका मीना शिंदे, वंदना शिखरे, रशिदा तांबोळी, शिक्षण राहुल रणवरे, केंद्रचालक ग्रामपंचायत लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.
०९जिंती
साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जिंती ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. (छाया : प्रशांत रणवरे)