सुनावणीला नागरिकांचीच दांडी

By admin | Published: December 26, 2014 10:45 PM2014-12-26T22:45:55+5:302014-12-26T23:44:29+5:30

मलकापूर शहरात प्रथमच मूल्यवर्धित करआकारणी लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Citizens' stick to the hearing | सुनावणीला नागरिकांचीच दांडी

सुनावणीला नागरिकांचीच दांडी

Next

मलकापूर : मूल्यवर्धित कर आकारणी विरोधात मलकापुरात एकूण तीन हजार शंभरपेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या आहेत. तीन टप्प्यांत होणाऱ्या सुनावणीत आज पहिल्या दिवशी हजार हरकती सुनावणीसाठी घेण्यात आल्या. मात्र, हजार हरकतदारांपैकी फक्त ५०१ हरकतदारच प्रत्यक्ष हजर राहिले. नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही केवळ पन्नास टक्के उपस्थिती असणे नागरिकांतील उदासीनता दर्शवत आहे. मलकापूर शहरात प्रथमच मूल्यवर्धित करआकारणी लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत शहरातील सर्व मिळकतदारांना कर योग्य मूल्याच्या नोटीसही देण्यात आल्या होत्या. नोटीसमधील अवास्तव कराच्या रकमा पाहिल्यानंतर शहरातून उठाव झाला. या प्रस्तावित कर प्रणालीच्या विरोधात हरकती दाखल करण्यासाठी २५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. तर काहीना २६ डिसेंबर मुदत देण्यात आली होती. आज (दि. २६ डिसेंबर) रोजी प्रथम एक हजार हरकतींवर सुनावणी होणार असल्याचे पत्रही हरकतदारांना देण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता सुनावणीस प्रारंभ झाला. दिवसभरात हजार हरकतदारांपैकी ५०१ हरकतदारांनी प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडले. या करप्रणालीवर हरकत असल्याची सर्वेक्षणात अनेक चुका असल्याचे निदर्शनास आणून दिले. नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना फक्त पन्नास टक्केच नागरिकांनी उपस्थिती दाखविणे, ही नागरिकांमध्ये असलेली उदासीनता दाखवित आहे.
या सुनावणीसाठी नगररचना विभागाचे सहायक संचालक श्रीकांत देशमुख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
नागरिक वंचित
मलकापूर शहरातील सोयी, सुविधांचा विचार करता मुंबईस्थित अनेक नागरिकांनी गुंतवणूक म्हणून मिळकती खरेदी केलेल्या आहेत. करप्रणालीबाबत नेमके काय निकष आहेत, हे कळेपर्यंतच हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत संपली. त्यामुळे अनेक नागरिक हरकती दाखल करण्यापासून वंचित राहिले आहेत.

Web Title: Citizens' stick to the hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.