दोन्ही राजेंच्या मावळ्यांचा शहर हद्दवाढीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:18 PM2017-09-26T23:18:05+5:302017-09-26T23:18:05+5:30

The city of Mavalai of both the states opposed the borderline | दोन्ही राजेंच्या मावळ्यांचा शहर हद्दवाढीला विरोध

दोन्ही राजेंच्या मावळ्यांचा शहर हद्दवाढीला विरोध

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीला खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मावळ्यांनीच विरोध केला आहे. मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत हद्दवाढीला विरोध करणारा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गटविकास अधिकाºयांच्या अभिप्रायासह हा ठराव जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार आहे.
पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी अमिता गावडे यांची उपस्थिती होती. शाहूपुरी, खेड, विलासपूर, आदी गावांचा हद्दवाढीनंतर सातारा
शहरात समावेश होणार आहे. सभेच्या सुरुवातीलाच हद्दवाढीचा विषय निघाला. खासदार उदयनराजे गटाचे सदस्य संजय पाटील यांनी शाहूपुरी गावचा हद्दवाढीत समावेश करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सातारा शहरातील नागरिकांनाच सुविधा मिळत नाहीत. आमच्या ग्रामपंचायती विकासासाठी सक्षम आहेत. ग्रामसभेने हद्दवाढीला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे.तसेच जिल्हाधिकाºयांकडे हरकतही नोंदविली आहे. सातारा नगरपालिका नागरिकांना योग्य सुविधा देऊ शकत नाही. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत स्वतंत्र पोलीस ठाणे, गावासाठी स्वतंत्र पोस्ट आॅफिस, आदी सुविधा असून, शाहूपुरीसाठी स्वतंत्र २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनादेखील थोड्याच कालावधीत सुरू होणार आहे. साताºयातील एका सेवाभावी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच शाहूपुरी ग्रामपंचायतीचा नगरपालिका हद्दवाढीत समावेश होऊ नये व ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, यासंदर्भात शाहूपुरीतील ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे शाहूपुरीला स्वतंत्र नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
हाच मुद्दा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे सदस्य आशुतोष चव्हाण यांनीही उचलून धरला. खेड, विलासपूर व लगतचा त्रिशंकू भाग यांचा समावेश शहराच्या हद्दीत होऊ नये, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. तसेच खेड आणि विलासपूर या दोन्ही ग्रामपंचायतींची मिळून नगरपंचायत स्थापन करण्यात यावी, असा ठराव यावेळी मांडला. या दोन्ही ठरावांना सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
तालुक्यात ३० ते ३५ अंगणवाड्यांना शासनाने मंजुरी दिली आहे; पण जागाच उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली असून, हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे मत सभापती मिलिंद कदम यांनी व्यक्त केले. जागा उपलब्ध झाल्यास इमारत उभारणी करून विद्यार्थ्यांची सोय त्या ठिकाणी करता येणार आहे.
यावेळी झालेल्या अरविंद जाधव, राहुल शिंदे, हणमंत गुरव, दयानंद उघडे, विजया गुरव यांनी सहभाग घेतला. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी बहुतांश सदस्यांनी केली. जिल्हा परिषदेचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहत नसल्याची तक्रार यावेळी सभापतींकडे करण्यात आली. त्यामुळे इथून पुढच्या सभांना सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी उपस्थित राहण्याबाबत नोटीस काढावी, अशा सूचना सभापती मिलिंद कदम यांनी प्रशाासनाला केल्या.

Web Title: The city of Mavalai of both the states opposed the borderline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.