शहरात पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्के; ग्रामीण भागामध्ये ११.८१ टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:15+5:302021-06-03T04:27:15+5:30

सातारा : जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षी केवळ शहरांमध्ये कोरोना फैलावला ...

City positivity rate 7%; 11.81 per cent in rural areas! | शहरात पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्के; ग्रामीण भागामध्ये ११.८१ टक्के!

शहरात पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्के; ग्रामीण भागामध्ये ११.८१ टक्के!

Next

सातारा : जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षी केवळ शहरांमध्ये कोरोना फैलावला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, या उलट परिस्थिती असून, ग्रामीण भाग कोरोनाने व्यापला आहे. गावेच्या गावे कोरोनाने बाधित आढळून येत आहेत. सध्या ग्रामीण भागामध्ये शाळांमध्ये लोकांना विलगीकरण कक्ष स्थापन करून त्याठिकाणी ठेवण्यात आले आहे. मात्र, या विलगीकरण कक्षामध्ये जाण्यास गावकऱ्यांमधून विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक जण घरातच औषधोपचार घेत आहेत. शहरातील कोरोनाची लाट आता हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र, ग्रामीण भागांमधील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य विभाग चिंतेत पडला आहे. सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये बहुतांश गावांत कोरोना पोहोचला आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी गावपातळीवर समित्या नेमल्या आहेत. या समित्या घराघरांत जाऊन नागरिकांना सजग आणि स्वच्छता राखण्याबाबत सांगत आहेत, तसेच मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा, असेही सांगत आहेत. सोशल डिस्टन्सिंग काही ठिकाणी पाळले जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये रुग्णवाढीचे हे एक मुख्य कारण असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सातारा

रुग्ण - ३५,४६६

पॉझिटिव्हिटी रेट - ९.५०

...

कराड

रुग्ण - २२,३९९

पॉझिटिव्हिटी रेट - ११.२८

.......

खंडाळा

रुग्ण - १०,४४३

पॉझिटिव्हिटी रेट - १२.८१

.........

कोरेगाव

रुग्ण - १४,३३८

पॉझिटिव्हिटी रेट - ८.७८

....

पाटण

रुग्ण - ६,९८१

पॉझिटिव्हिटी रेट - १०.१७

.....

फलटण

रुग्ण - २६,३६०

पॉझिटिव्हिटी रेट - २०.०९

.....

वाई

रुग्ण - ११,५९३

पॉझिटिव्हिटी रेट - ५.४७

......

खटाव

रुग्ण - १५,९७७

पॉझिटिव्हिटी रेट - १५.६५

.....

माण

रुग्ण - ११,५११

पॉझिटिव्हिटी रेट - १२.४९

........

महाबळेश्वर

रुग्ण - ४,०३०

पॉझिटिव्हिटी रेट - २.६६

.....

जावळी

रुग्ण - ७,६३२

पॉझिटिव्हिटी रेट - ७.६१

..................

३० मार्च

एकूण बाधित गावे - ६५२

सक्रिय रुग्ण असलेली गावे - ५८७

२५ पेक्षा कमी असलेली गावे - ३८०

२५ ते ५० असलेली गावे - ४२३

१० पेक्षा जास्त असलेली गावे - ३८६

Web Title: City positivity rate 7%; 11.81 per cent in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.