शहरात जिकडे तिकडे; रस्त्याकडेला वाहने..!

By admin | Published: July 1, 2017 12:57 PM2017-07-01T12:57:37+5:302017-07-01T12:57:37+5:30

फूटपाथचा पार्किंगसाठी वापर: पे अँड पार्कची गरज; वाहनतळाअभावी वाहने असुरक्षित

In the city there; Road to the road ..! | शहरात जिकडे तिकडे; रस्त्याकडेला वाहने..!

शहरात जिकडे तिकडे; रस्त्याकडेला वाहने..!

Next


आॅनलाईन लोकमत

सातारा , दि. 0१ : सातारा शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून रस्त्याच्याकडेला जिकडे-तिकडे वाहनेच वाहने दिसत आहेत. त्यातच शहरातील फूटपाथचा वापर पार्किंगसाठी करण्यात येत असून येथे पे अँड पार्कची खरी गरज आहे. तसेच येथे वाहनतळाअभावी वाहने असुरक्षित आहेत.

चोहोबाजूने वाढत चाललेले सातारा शहर वाहन तळाविना असल्याचे दिसून येत आहे. जिकडे तिकडे चोहूकडे वाहने आणि वाहनेच दिसत असल्याने पार्किंग कोठे करावे हेच आता वाहनचालकाना सूचत नाही.़ शहरातील विविध भागात व विशेषत: करुन राजवाडा, मोती चौक, मारवाडी चौक, देवी चौक, पोवई नाका परिसरात वाहनाच्या मोठमोठ्या रांगा उभे असल्याचे दिसून येते़ ही वाहने उभी राहत असल्याने अनेक नागरिकांना रस्ता ओलांडून समोरच्या दुकानात खरेदीसाठी जाता येत नाही, अशी परिस्थिती शहराच्या सर्व भागात आढळून येते़

शहरातील वाहनांची वाढती संख्या पाहता याबाबतचा नियोजनाचा आराखडा संबंधीत यंत्रणेकडे असणे गरजेचे आहे़ परंतू, नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तर वाहने फूटपाथवर लावली जातात़ त्यामुळे नागरिकांना फूटपाथवरुन ही चालता येत नाही़ वास्तविक वाहन व्यवस्थेबाबत संबंधीत यंत्रणेकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत़ परंतू, शहरात एक ही पे अँड पार्कचे वाहनतळ उपलब्ध नसल्याने या समस्या उभ्या राहिल्या आहेत़ अर्थात रस्त्याकडेला वाहने उभी राहिल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडण्याच्या घटना घडल्या आहेत़ याबाबत प्रशासन यंत्रणेनी दखल घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येते़ परिणामी रस्ता दिसेल तेथे लावा वाहने अशी परिस्थिती शहरात दिसून येते़

तसेच गेल्या काही वर्षांत वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे़ वाहने रस्त्याकडेला असुरक्षित असल्याने शहराच्या विविध भागात पे अ‍ॅड पार्किंगची सोय होणे गरजेचे आहे़ यामुळे संबधीत विभागाला अर्थिक लाभ व अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल़


पे अँड पार्कची सोय सातारा शहरात नसल्याने अनेकजणांनी आपली वाहने असुरक्षित वाटतात़ शहराच्या सर्व भागात रस्त्याकडेला वाहने उभी करुनच नागरिकांना खरेदी करावी लागते हे वास्तरुप आहे़ शहराच्या मुख्य रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या या वाहनांबाबत अद्याप कोणतेही नियोजन नाही अथवा रस्ता रुंदीकरण केले नाही. विशेषत: शहरातील मोती चौक ते मारवाडी चौक मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग जणू दिसून येते़ पे अँड पार्क हे उत्पन्नाचे साधन असून त्याकडे संबंधीत यंत्रणा कानाडोळा का करते हे समजत नाही़
- श्रीरंग काटेकर, सातारा

Web Title: In the city there; Road to the road ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.